Groom And Bride Viral Video: लग्नसराईचा सीजन सुरु झाल्याने नवरा नवरीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भर लग्नमंडपात कधी नवरदेवर भन्नाट डान्स करतो, तर कधी डीजेच्या तालावर नवरी थिरकते. अशाप्रकारचे भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर दिवसेंदिवस व्हायरल होताना दिसत आहेत. वऱ्हाडी पाहुण्यांचं मनोरंजन करण्यासाठी नवरा-नवरी स्टेजवरच थिरकतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत. पण एका लग्नमंडपात नवरीने कमालच केली आहे. लग्नसोहळा संपल्यानंतर नवरीने नवऱ्याला चक्क वऱ्हाडी पाहुण्यांच्या समोरच उभा केला. त्यानंतर नवरीने जे केलं ते पाहून नवरदेवासह सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नवरा-नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत. नवरीने नवऱ्यासमोर असं काय केलं की, नवऱ्या सर्वांसमोर लाजला. पाहा व्हायरल झालेला हा भन्नाट व्हिडीओ.

नवरीचं कृत्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावाल

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नवरीने नवऱ्याला पाहुण्यांसमोर उभं केलं. त्यानंतर त्याच्या हातात गुलाबाचा फूल दिलं. पाहुण्यासमोर नवरीने उभं केल्यानंतर नवरा हळव्या मनाने हसत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तर नवरीने नवऱ्याला सनी लियओनीचं लोकप्रिय गाणं ‘मेरे सइयां सुपरस्टार’ डेडिकेट करून भन्नाट डान्स केला. लिरिक्स सोबतच नवरी या गाण्यावर थिरकताना व्हिडीओत दिसत आहे. त्याचवेळी नवराही भर लग्नमंडपात लाजला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ prabhatweddingvlogger नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नक्की वाचा – ‘क्विन’ आजीबाईंची कमाल! ८३ व्या वर्षी कॅरम स्पर्धेत जिंकलं सुवर्ण, एकेरीत कांस्यपदकावरही मारली बाजी, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Wedding Videos (@prabhatweddingvlogger)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा-नवरीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान गाजला असून हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर हजारोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूजही मिळाले आहेत. व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “नवरा सदम्यात गेला”. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कोणत्या प्रसिद्धी माध्यमात आले आहेत तुमचे नवरदेव….” नवरीन सनी लिओनीच्या गाण्यावर थिरकली आणि सर्व पाहुण्यांसह नवऱ्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. नवरी-नवरी स्टेजवर भन्नाट डान्स करून वऱ्हांडी मंडळींचं मनोरंजन करण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.