Viral video: भारतात सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्न, विधी, परंपरा या गोष्टी अगदी सहज येतात. भारतात वेगवेगळ्या प्रथांमध्ये लग्नाच्या विधी केल्या जातात. यामध्ये काही विधी अशा आहेत ज्या वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत. यामागे काही धार्मिक कारणं आहेत तर काही ट्रेंडिंगनुसार पद्धती फॉलो केल्या जातात. एकूणच लग्नातील प्रत्येक विधीचा नातेवाईक, मित्रमंडळी आनंद घेतात.
लग्नाच्या अनेक विधींमध्ये एका विधीची मात्र वधूच्या मेव्हणी आणि इतर नातेवाईक मंडळी आवर्जून वाट पाहतात ते म्हणजे बूटं चोरण्याची पद्धत. लग्नात वधूच्या बहिणीकडे हा विशेष अधिकार दिला जातो आणि वेगवेगळ्या शक्कल लावून वराचे बूट अखेर चोरले जातात. सर्व विधीअंती वराकडून बूट परत घेण्याचे पैसे मागितले जातात आणि वर स्वखुशीने मागितलेली रक्कम देतोसुद्धा. अशा प्रकारे ही विधी अधिक रंगत जाते आणि आजूबाजूचं वातावरणाची मजा वाढवते. पण सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये लग्नाच्या वेळी बूट चोरताना चक्क नवरदेवाचा पायच मोडला…याचा व्हिडीओही व्हायल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
लग्नात चपला चोरण्याच्या या विधीमागे अनेक कारणे दिली जातात. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीचे बूट चोरल्याने त्या व्यक्तीबद्दल अनेक रहस्ये उघड करू शकतात. अशावेळी बूट चोरण्याच्या या विधीबरोबरच वधूची बहीण किंवा मैत्रिणीही आपल्या भावोजींची पर्सनॅलिटी टेस्ट करतात. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की बूट चोरण्याच्या या विधी दरम्यान, दोन कुटुंबांमध्ये संभाषण होते, ज्यामुळे नातं अधिक घट्ट होतं. मात्र इथे तर चक्क हाणामारी आणि हिंसा पाहायला मिळाली. मात्र यामध्ये नवरदेवाचा याचा फटका बसला भर लग्नाच्या दिवशीच त्याचा पाय मोडला. यानंतर नवरदेवाच्या घरची सर्व मंडळी संतापलेली दिसत आहेत. शेवटी सर्व वरिष्ठ माणसांनी तरुण तरुणींना बाजूला केलं आणि गोंधळ मिटवला.
पाहा व्हिडीओ
लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. लग्नातील गमती जमती या सतत समोर येत असतात. काही कारणांवरून रुसवे फुगवे किंवा मग धमाल मजा मस्ती ही होतच असते. लग्नाचे हटके व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात असाच हा व्हिडीओ आता समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ rahul.sirsat.56829 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.