Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही महिलांचा एक ग्रुप दिसेल ज्या सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay)

महिलांनी केला जबरदस्त डान्स (Dance video)

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्या अप्रतिम डान्स करताना दिसतात. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल.

हेही वाचा : फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral video)

हेही वाचा : “तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच

mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “”दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जबरदस्त डान्स” तर एका युजरने लिहिलेय, “काय ऊर्जा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान झाला डान्स तुम्ही सर्व ताई लोकांनी. खरंच खूप मनापासून नमस्कार” एक युजर लिहितो, “खुप खुप छान डान्स. सुरज चव्हाण पाहिजे होता.” तर एक युजर लिहितो, “खूप छान आहे ताई असेच रिल्स करत रहा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी गावंडे या डिजिटल क्रिएटर आहे ज्या त्यांच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करतात. त्या खूप सुंदर डान्स करतात. त्यांच्या डान्सचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. अनेकदा त्यांच्याबरोबर इतर महिलाही डान्स करताना दिसतात. त्यांच्या डान्स रिल्सवर नेटकरी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.