राजस्थानच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्या एका गरीब बेरोजगार तरुणाला एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची GST भरण्याची नोटीस आल्याची विचित्र घटना घडली आहे. शिवाय नोटीसमध्ये तरुणाच्या नावावर थकीत असणारा कर लवकर न भरल्यास कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे. त्यामुळे या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तरुणाने आपण बेरोजगार असून उत्पनाचे कसलेही साधन नसल्यामुळे जीएसटी भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका व्यावसायिकाने या तरुणाच्या पॅनकार्डचा चुकीचा वापर करत करोडोंची उलाढाल केल्यामुळे केंद्रीय जीएसटी विभागाने जैसलमेरच्या या बेरोजगार तरुणाला एक कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रुपयांची जीएसटीची नोटीस पाठवली आहे. दिल्ली उत्तर आयुक्तालयाकडून नोटीस देण्यात आलेल्या तरुणाचे नाव नरपतराम असं असून तो रिडवा जैसलमेर येथील रहिवासी आहे. या तरुणाला याप्रकारची नोटीस मिळाल्यानंतर त्याने लगेच पोलिसांत धाव घेतली आणि त्याच्यासोबत घडलेला घटनेची माहिती दिली. यानंतर एसपींनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

नरपतरामने सांगितलं की, आपण बेरोजगार असून सध्या वडिलांवर अवलंबून आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी केंद्रीय जीएसटी विभागाकडून मला नोटीस मिळाली, ज्यामध्ये एक कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रुपये कर थकीत असल्याचे सांगण्यात आलं आहे. शिवाय या तरुणाला ९ जानेवारी रोजी दिल्लीत बोलावण्यात आलं आहे.

पॅन कार्डद्वारे फसवणूक –

हेही वाचा- “मांजरीची पिल्लं दत्तक घ्या आणि मोफत विमान प्रवास करा”; ‘या’ कंपनीची ऑफर होतेय व्हायरल

दरम्यान नरपतरामने, त्याची कसली फर्म नाही शिवाय कोणताही व्यवसायही नाही. शिवाय कोणीतरी माझ्या पॅनकार्डचा दुरुपयोग करून फर्म बनवत काही पैशांची उलाढाल केल्यामुळे आपणाला ही नोटीस मिळाली असल्याचं सांगितल. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्डसह इतर कागदपत्रांचा गैरवापर करून एक फर्म स्थापन केल्याचे आढळून आलं आहे. तर सदर व्यक्ती दिल्ली येथील असून त्याने हा बनाव केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

नरपतराम करतोय शिक्षक भरतीची तयारी –

नोटीसनुसार, नरपतरामच्या पॅनकार्डवर एक फर्म कार्यरत आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्डवर कंपनीची नोंदणी केली जाते. मात्र, आपणाला याबाबत कोणतीही माहिती नसून मी सध्या शिक्षक भरती परीक्षेची तयारी करत असल्याच नरपतरामने सांगितलं आहे. पोलिस अधीक्षक भंवर सिंह नाथवत यांनी सांगितले की, पीडित तरुणाने त्याच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबतची माहिती दिली. सदर पोलीस ठाण्याला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दोषींविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिस एसपींनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst department sent 1 crore 36 lakh tax notice to poor unemployed youth jap
First published on: 06-01-2023 at 16:13 IST