Man Cuts Garlic Slices To Set World Record: जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या पुस्तकामध्ये अनेक विक्रमांची नोंद होत असते. जास्तीत जास्त नारळ फोडणे, सर्वाधिक दात असणे, पाण्याखाली जादू दाखवणे, जास्तीत जास्त बर्गर खाणे, रुबिक क्यूब सोडवणे आदी अनेक विक्रम यात नोंदविण्यात आले आहेत. पण, आज ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने (Guinness World Records) आणखीन एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. ज्यात एका तरुणाने अगदीच चतुराईने ३० सेकेंदात सर्वाधिक लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करण्याचा विश्वविक्रम केला आहे.

वॉलेस वोंग हा तरुण लंडनचा रहिवासी आहे. वॉलेस वोंग यांना ऑनलाइन “सिक्स पॅक शेफ” (Six Pack Chef) म्हणून ओळखले जाते. १२ जून २०२४ रोजी यांनी एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. टेबलावर रांगेत काही लसणाच्या पाकळ्या ठेवल्या आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) अधिकारी काउंट डाउन करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर तरुण अवघ्या तीस सेकेंदात सर्वाधिक लसूण पाकळ्या कापतो. तरुणाने नेमक्या किती लसणाच्या पाकळ्या कापल्या व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…नृत्य, चित्रकला नव्हे त्यांना सायकल बनवण्याची आहे आवड; VIDEO तून बॅटरीवर चालणारी सायकल अन् आनंद महिंद्रानी केलेलं कौतुक पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) अधिकारी काउंट डाउन करण्यास सुरुवात करतात. तेव्हा तरुण एका रांगेत ठेवलेल्या लसणाच्या पाकळ्या कापण्यास सुरुवात करतो. तरुण फक्त ३० सेकेंदात ११७ स्लाइस कापतो. वेळ संपताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) अधिकारी त्याला प्रमाणपत्र देतात आणि त्याचे कौतुक करतात. तरुणाच्या बोटाची जखम त्याने पूर्ण केलेल्या या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा पुरावा आहे असे म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @guinnessworldrecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये या व्हिडीओबद्दल माहिती आणि रेकॉर्ड बद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये तरुणाचे कौतुक करत आहेत. तर काही जण तरुणाच्या बोटाची जखम पाहून चिंता व्यक्त करत त्याची प्रशंसाही करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका रोबोटने ०.०३५ सेकंदात रुबिक क्यूबचे कोडे सोडवून दाखवले होते. तर आज तरुण ३० सेकेंदात ११७ लसणाचे तुकडे करण्यात तरुण यशस्वी झाला आहे.