प्रवेश शुल्क म्हणजेच एन्ट्री फी. सिनेमा, नाटक किंवा कोणत्याही सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये जाण्याआधी प्रवेश शुल्क आकारले जाते. यातून कार्यक्रमाकरिता झालेला खर्च भागवला जातो. प्रवेश शुल्क हे प्रामुख्याने पैश्याच्या स्वरुपात असते. पण काही ठिकाणी एन्ट्री फीसाठी पैश्यांच्याऐवजी इतर गोष्टींचा वापर केला जातो. गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रवेश शुल्क म्हणून भाकरीचा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ५०,००० पेक्षा जास्त भाकऱ्या जमा झाल्या होत्या.

गुजरातमधील पाटन येथे रोटलिया हनुमान हे जागृत देवस्थान आहे. या मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याने तेथे ‘लोक दयारो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोक दयारोमध्ये परमेश्वरासाठी भजन करत त्याची स्तुती केली जाते. तसेच गुजरातीमध्ये कथांचे वाचन केले जाते. या कार्यक्रमाला गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांना भजन-कीर्तन करण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यांनी ट्विटरवर या कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कीर्तिदान यांच्या आजूबाजूला भाकऱ्यांचे मोठ्ठाले डोंगर पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – “Apple वरील निष्ठा…” अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला आलेल्या व्यक्तीच्या हातातील ‘ती’ वस्तू पाहून CEO झाले थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाकरीचा वापर एन्ट्री फीसाठी का करण्यात आला?

मंदिरांमध्ये नारळ, पेढे अशा गोष्टी देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवल्या जातात. काही ठिकाणी नैवेद्यामध्ये इतर गोष्टींचा समावेश असतो. गुजरातमधील रोटलिया हनुमान मंदिरामध्ये रोटी म्हणजेच भाकरीचा नैवेद्य दाखवून ती प्रसाद म्हणून भक्तांना दिली जाते. या हनुमान मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याने आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एक रोटला (मोठी भाकरी) किंवा १० रोटली (१० छोट्या आकाराच्या भाकऱ्या) दान करणे आवश्यक होते. जमा झालेल्या भाकऱ्या प्रसादाच्या स्वरुपामध्ये लोकांना वाटण्यात आल्या. गरजू-उपाशी व्यक्तींना जेवण मिळावे यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच भूतदयेच्या भावनेने तेथील भटके कुत्रे व अन्य प्राण्यांनाही खाण्यासाठी भाकऱ्या देण्यात आल्या.