पारंपरिक अन्न पदार्थ आणि त्यांना बनवण्याच्या पद्धती सोडून काही लोक त्यात विचित्र काहीतरी करून वेगळेच खाद्य पदार्थ निर्माण करत असल्याचे पुढे आले आहे. मॅगी शेक, रसगुल्ला चॅट असे एकमेकांशी संबंध नसलेले अनेक पदार्थ खाद्य प्रेमींनी करून बघितले. मात्र हे फ्यूजन काही लोकांच्या पचनी पडले नाही. आता याच यादीत आणखी एका पदार्थाचा समावेश झाला आहे. हा पदार्थ तूफान व्हायरल होत आहे.

गुलाब जामूनला दिले हे रूप

@Tabeshq टी या नावाच्या ट्विटर यूजरने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका व्यक्तीने गुलाबजामूनसोबत वेगळाच प्रयोग केला आहे. त्याने चक्क ब्रेडच्या दोन तुकड्यांमध्ये गुलाब जामून पसरवत एक नवीनच डिश बनवली आहे. @Tabeshq टी ने या खाद्यपदार्थाला गुलाब जामून बर्गर असे संबोधले आहे. गोड गोड गुलाबजामूनशी केलेल्या या छेडछाडीवर नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(Viral video : वडिलांनी घेतलेल्या XUV 700 वर चिमुकलीची जोरदार प्रतिक्रिया, आनंद महिंद्रा म्हणाले, मुली तुने..)

ही लोक येतात तरी कोठून

एका यूजरला हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. त्याने थेट असे व्यक्ती येतात तरी कोठून, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकीला हे पाहूनच किळस आल्याचे दिसते. तिने प्लिज असे करू नका अशी विनंती केली. तर एकाने नाराजी व्यक्त करत, जेव्हा या पदार्थावर नवीन करण्यासारखे काही नसते तेव्हा हे असे होते, अशी प्रतिक्रिया दिली. तर एका यूजरने चक्क त्यास अवैधच घोषित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत या व्हिडिओला २० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. नेटकऱ्यांना हे पदार्थ पटल्याचे दिसत नाही. उलट संताप व्यक्त होत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी हा अनोखा प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फटकारत आहे.