Viral video: देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हल्ली मुलींना स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासून दिले जातात. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तरुणीची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्यांना सर्वांसमोर चांगलीच अद्दल घडवली आहे. हा तरुण आता पुन्हा याच काय कोणत्याच मुलीच्या नादाला लागणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी गाडीवर बसलेल्या तरुणाला कॉलरला पकडून बेदम मारत आहे. तुझ्या घरी आई नाहीये का? बहिण नाहीये का? असं ती त्या तरुणाला विचारत आहेत.. यावेळी तो तरुण हात जोडून माफी मागतानाही दिसत आहे. मात्र ही तरुणी त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. ती त्याला मारतच आहे. दरम्यान उपस्थित असलेल्या एकानं या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अतिशहाणपणा! हायवेवर सुसाट गाडीवर हात सोडले अन् मग…थरारक Video Viral
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshया पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.