Shocking video: स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जीम ट्रेनरने जीममध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग करत तिला अमानुष मारहाण केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला खरंच सुरक्षित आहेत ?

महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न वारंवार विचारायला लावणाऱ्या घटना सतत समोर येत राहतात. सध्या समोर आलेला हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील राणाघाट जिल्ह्यातील एका जिमचा आहे. जिथे एक जिम ट्रेनर एका महिलेवर जबरदस्ती करताना दिसत आहे. सध्या पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे.या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जिम ट्रेनर एका महिलेजवळ उभा राहून तिच्याशी बोलत आहे. ती महिला उठून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच, जिम ट्रेनर तिच्या मागे धावतो, तिचा हात पकडतो, तिला ५ ते ७ चापट मारतो आणि केस पकडू तिला खाली फेकतो. त्यानंतर तो महिलेवर जबरदस्ती करू लागतो.

विनयभंगाचा संतापजनक VIDEO समोर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, किती क्रूरपणे हा व्यक्ती महिलेला मारहाण करत आहे. कधी तिच्या तोंडावर चापट मारत आहे तर कधी तिच्या अंगावर बसून तिचा विनयभंग करत आहे. तिला मिठी मारताना तसेच तिचे कपडे फाडतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. ती मात्र वेदनेने किंचाळत आहे, स्वत:ला या हैवानाच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं दिसून येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरे खड्ड्यात गेलं तुमचं कुटुंब” टार्गेट पूर्ण न केल्यानं बँक मॅनेजरची शिवीगाळ; मिटींगचा VIDEO झाला व्हायरल अन्…

महिलेशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. @ruchikokcha नावाच्या युजरने एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “हे फुटेज बॉडी लॅब पॉवर जिम राणाघाट, पश्चिम बंगालचे आहे. जिथे जिम ट्रेनर एका महिलेचे शारीरिक शोषण करताना दिसत आहे. ती मदतीसाठी ओरडत आहे, पण कोणीही तिला मदत करत नाही. महिलांना कधी सरक्षित वातावरण मिळणार? अशा घटनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. कृपया @WBPolice या ट्रेनर आणि जिमवर कारवाई करा.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gym trainer physically abusing a woman and mercilessly beats woman in west bengals ranaghat arrested after video goes viral srk