Bank Officers Abuse Staff Over Targets video: नोकरी आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी माणसासाठी महत्त्वाच्या आहेत. एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करते आणि नोकरी करण्यामागचा उद्देशही कुटुंब असतो.पण तुमची नोकरी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर नेत असेल तर? तुमची नोकरी तुमच्या कुटुंबापेक्षा वरचढ असली पाहिजे, असे फर्मान काढले जात असेल तर तुम्ही काय कराल? कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना कंपनीकडून कर्मचाऱ्याला टार्गेट दिलं जातं. ते टार्गेट कर्मचाऱ्यांकडून पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी बॉसची असते. अनेकदा टार्गेट पूर्ण होत नाही, तेव्हा बॉस आणि कर्मचारी यांच्यात खटके उडतात. अशाच एका बँक मॅनेजरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये या मॅनेजरने एका सहकाऱ्याच्या कुटुंबावर अपशब्द वापरत त्याचा अपमान केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी या बँक मॅनेजर विरोधात संताप व्यक्त करत आहेत.

“अरे खड्ड्यात गेलं तुमचं कुटुंब”

“अरे तुमचं कुटुंब खड्ड्यात जाऊदेत” अशा भाषेत या बँक मॅनेजरने त्याच्या सहकाऱ्याचा भर मीटिंगमध्ये अपमान केला. व्हिडिओमध्ये मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना दिसत आहे की, तुमचे कुटुंब खड्ड्यात जाऊदेत, तुमच्यासाठी कॅनरा बँक सर्वांत वरची आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कॅनरा बँकेचा मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. कर्जवसुलीत हलगर्जीपणा केल्याबद्दल येथील मॅनेजरने कर्मचाऱ्यांना खडसावले व सुट्टी देणार नसल्याचे सांगितले. विकली मिटींगची ही रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांसाठी आदेशही जारी केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मॅनेजर म्हणताना दिसत आहे… “सुट्टी असली तरी तुम्हाला काम करावे लागेल, बँकेने तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फिरण्यासाठी नोकरी दिली नाही, तुमचे कुटुंब खड्ड्यात जाऊदेत. मला काही फरक पडत नाही. कॅनरा बँक हे माझे कुटुंब आहे.” त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना जोरदार धमक्या देताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर तयार; अन् नवरी बॉयफ्रेंडच्या गाडीत बसून फरार

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅनरा बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही आढावा मीटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास मनाई केली आहे.Hellobanker नावाच्या YouTube चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडिओलाही अनेकांनी लाइक केले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत. एका युजरने लिहिले… यामुळेच लोक बँकेच्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकऱ्यांकडे धाव घेत आहेत. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… प्रत्येक बँकरने अशा प्रकारच्या टार्गेट आधारित कामावर बहिष्कार टाकला पाहिजे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले… तो खूप मूर्ख मॅनेजर आहे, त्याला त्याच्या पदाच्या प्रतिष्ठेचीही पर्वा नाही.