आपलं घर इतरांना भाड्याने देताना काही महत्त्वाची कागदपत्रे, किती भाडं घ्यायचं किंवा भाड्याने राहणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात येते. पण, तुम्ही कधी असं ऐकलं आहे का, एखादं घर भाड्याने घेताना मुलाखत घेण्यात आली आहे? नाही, तर बंगळुरूमध्ये एका महिलेने हा अनुभव शेअर केला आहे. भाड्याने घर शोधत असताना तिची मुलाखत घेण्यात आली आणि त्यानंतर काही दिवसांनी महिलेची निवड करण्यात आली; असा संदेश तिला अज्ञात घर मालक करते.
महिलेनं एक पोस्ट शेअर केली आहे. इशू असे या महिलेचं नाव असून घर खरेदी दरम्यानचा अनुभव तिने शेअर केला आहे. घरमालकाच्या संवादादरम्यानचा एक स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे आणि तिचा अनुभव सांगितला. घर खरेदी करताना अशी मुलाखत घेण्यात आली आहे, जणू काही तिला नोकरीच देणार आहेत. अज्ञात घरमालक महिलेची मुलाखत घेते आणि त्यानंतर भाड्याने घर खरेदी करण्यासाठी तिची निवड झाली आहे, असे तिला मेसेज करून कळवते. घरमालकाने घेतलेल्या मुलाखतीत महिलेची निवड कशी झाली, एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.
हेही वाचा… शतकवीर विराट कोहलीची ग्राउंड स्टाफला सुंदर भेट; IND vs SA सामन्यातील ‘हा’ Video पाहून भारावले फॅन्स
पोस्ट नक्की बघा :
अज्ञात घरमालकाने महिलेला संदेश पाठवून लिहिले की, नमस्कार, त्या दिवशी तुम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला. आपल्या भेटीदरम्यान जसे मी नमूद केले होते की, ही प्रॉपर्टी घेण्यास जे इच्छुक असतील त्यांच्याशी मी वैयक्तिकरित्या संवाद साधेन. मला अद्याप सर्वांना भेटण्याची संधी मिळाली नाही. पण, मग मी विचार केला की, मी त्या सगळ्यांना भेटेन आणि जाणून घेईन की, भाड्याने घर खरेदी केल्यानंतर कोण त्याची योग्य काळजी घेऊ शकेल. माझ्या शॉर्टलिस्टप्रमाणे मी तुमची निवड करते आहे आणि तुम्हाला पहिली संधी देते आहे. भाड्याने घर खरेदी करण्याच्या अटी खालीलप्रमाणे, असा संदेश अज्ञात मालकाने केला आणि महिलेची घर खरेदीसाठी निवड केली.
पुढे महिलेने लिहिले आहे की, घर भाड्याने देताना लोक पैशाबद्दल बोलतात, समोरच्याची चौकशी करतात. पण, घर भाड्याने देण्यासाठी अशी मुलाखत घेतली जाईल याची मी अपेक्षा केली नव्हती. तसेच कमेंटमध्ये एका युजरने तिची निवड झाल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, महिलेने सांगितले की, आम्ही ते घर विकत नाही घेतले. सोशल मीडियावर ही पोस्ट महिलेच्या @DimpledJalebi या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.