Year Ender Hair Trends 2023: वर्ष २०२३ संपत आले आहे आता काहीच दिवस बाकी आहेत म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात आता लवकरच होईल. अशावेळी लोक नववर्षाच्या स्वागताची तयार करत आहे. लोक वेगवेगळे नववर्षाचे संकल्प ठरवत आहेत. त्यासाठी तुम्ही लोकांपैकी एक आहात आणि यंदा तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प म्हणून जर स्वत:चा लूक बदलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

कोणत्याही व्यक्तीने काहीतरी हटके हेअरस्टाइल केली तर सौदर्यात आणखी भर पडते. पण अशा स्थितीमध्ये २०२३मध्ये महिलांची आणि पुरुषांद्वारे सर्वात अधिक पसंती मिळालेल्या काही हेअरस्टाइलबाबत आम्ही सांगणार आहोत. या यादीमध्ये तुम्ही सर्वात उत्तम पर्याय तुमच्यासाठी निवडू शकता.

स्लीक हेअर स्टाइल
या यादीमध्ये सर्वात प्रथम स्थान मिळवले आहे स्लीक हेअर स्टाइलमध्ये. ही हेअरस्टाइल सध्या ट्रेंडमध्ये आहे. विशेषत: केस मोकळे सोडल्यानंतर हेअर स्टाइलला पसंती दिली जाते. तुमचे केस लहान असो किंवा मोठे तुम्ही एथनिक किंवा वेस्टर्न कपडे परिधान केले असेल तर ही हेअरस्टाइल अगदी परफेक्ट असला पाहिजे. पण अशा स्थितीमध्ये यंदा तुम्ही तुमच्या लूक बदलू इच्छित असाल तर तुम्ही ही हेअरस्टाइल करून पाहू शकता.

हेही वाचा – धक्कादायक! तब्बल १५ वर्षे डोळ्यात लाकडी कूस घेऊन जगत होती व्यक्ती!

ओपन वेव्ही हेअर्स
ही हेअरस्टाइल देखील ट्रेंडमध्ये आहे. विशेषत: बॉलीवूड अभिनेत्रींसाठी ओपन वेव्ही हेअर्स ही पहिली पंसत ठरते. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आणि स्टाइलिश लूक देखील मिळतो. तुम्ही केसांना हलके कुरळे करून वेव्ही हेअर स्टाइल स्विकारू शकता. ही हेअरस्टाइल वेस्टर्नपासून एथनिक ड्रेसमध्ये खूप चांगली दिसते.

लेअर्ड बॉब हेअर स्टाइल
लेअर्ड बॉब हेअरस्टाइल नेहमीच ट्रेंडमध्ये असते. विशेषत: वेस्टर्न ड्रेसवर लेअर्ड बॉब हेअरस्टाइल खूप चांगली दिसते. २०२३मध्ये हेअर स्टाइल ट्रेंडमध्ये होती.

हेही वाचा – दुर्गम समुद्रकिनाऱ्यावर उलटे पडले होते कासव, सरळ होण्यासाठी धरपडणाऱ्या कासवाचा व्यक्तीने वाचवला जीव; Viral Video

मेसी बन हेअर स्टाइल
मेसी बन हेअर स्टाइल वर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये आहे. यंदाही हा लूक लोकांना खूप आवडला. मेसी लूक प्रत्येक प्रकारच्या कपड्यांवर आणि प्रत्येक आकारांच्या केसांवर केला जाऊ शकतो. विशेषत: पार्टीमध्ये मेस बन परफेक्ट होऊ शकतो, त्यामुळे तो तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो.

पुरुषांची ही पहिली पसंती होती

कर्ली हेअर स्टाईल
कर्ली हेअर स्टाईल या वर्षी पुरुषांची पहिली पसंती ठरली आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक अभिनेत्यांनी कर्ली हेअरस्टाइल स्वीकारली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साइड पार्टिंग हेअर स्टाइल
२०२३ मध्ये साइड पार्टिंग खूप आवडले होते. या लूकमध्ये एका बाजूचे केस लहान आहेत. तर दुसऱ्या बाजूचे केस मोठे आहेत. यंदा पुरुषांना या दोन्ही हेअर स्टाईलना खूप आवडल्या.