सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही मजेशीर आपणाला पोट धरुन हसवणारे असतात तर काही आपल्या अंगावर शहारे आणणारे असतात. मात्र, काही काही व्हिडीओ असेही असतात जे पाहिल्यानंतर आपण भावूक होतो शिवाय ते व्हिडीओ पाहून आपले डोळे पाणावतात. या जगात दोन प्रकारची माणसं आढळतात, एक म्हणजे खूप श्रीमंत तर दुसरी अतिशय गरीब इतकी गरीब की दोन वेळच्या अन्नासाठी त्यांना लोकांकडून भीक मागावी लागते. त्यांना खूप संकटांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना पाहून आपलंही मन हेलावतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यातील दृश्य पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी येऊ शकतं.

हेही पाहा – नवरा न सांगता घरातून निघाला म्हणून संतापली बायको; धडा शिकवण्यासाठी हातात घेतली वीट, भांडणाचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘रोबर्ट लिंगदोह’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला दिसत आहे, जी अपंग असल्याचं दिसत आहे. ही महिला काठीचा आधार घेत चालताना दिसत आहे. शिवाय तिची परीस्थिती एवढी वाईट आहे की, तिला साधं सरळ चालताही येत नाही, ती कंबरेत वाकून चालत असल्याचं दिसत आहे. शिवाय तिच्या पाठीवर एक लहान मुलगा बसल्याचंही दिसत आहे. वाईट बाब म्हणजे ती रस्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांकडे भीक मागत आहे. त्यामुळे या महिलेकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत त्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे असं नेटकरी म्हणत आहेत. व्हिडीओत पुढे दिसत आहे की, एक तरुण या महिलेच्या जवळ जातो आणि तिला काही पैसे देतो. हा व्हिडिओ शेअर करताना ट्विटर यूजरने लिहिले आहे, “व्हिडीओतील दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाची धडधड थांबू शकते, एकवेळ नरकातून बाहेर पडता येऊ शकते पण गरिबी हाच पृथ्वीवरील खरा नरक आहे.”

नेटकऱ्यांनी केली प्रार्थना –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, देव सर्वांचं रक्षण करो. तर अनेक नेटकऱ्यांनी हात जोडलेले इमोजी पोस्ट करून प्रार्थना केली आहे. तर एका युजरने महिलेच्या पाठीवर बसलेल्या मुलावर प्रश्न उपस्थित केला आहे की, “तो पाठीवर का बसला आहे?” दुसऱ्या एकाने लिहिलं “अशा लोकांची सरकारने काळजी घ्यायला पाहिजे.”