Teachers’ Day 2025 Wishes SMS Messages: आज देशभरात ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात वेगळं महत्त्व घेऊन येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळला जातो. हा दिवस केवळ औपचारिक नसून, तो गुरुजनांप्रति कृतज्ञतेची जाणीव करून देणारा दिवस आहे. शिक्षक म्हणजे फक्त धडे शिकवणारा नाही, तर आयुष्य घडवणारा खरा शिल्पकार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात गुरूचं स्थान सर्वांत मोठं असतं. आई-वडील आपल्याला जन्म देतात; पण जगण्याची कला, योग्य मार्गदर्शन, संस्कार आणि ज्ञान देणारे खरे शिल्पकार म्हणजे शिक्षक. त्यांच्यामुळेच एका विद्यार्थ्याचं भविष्य उजळतं, त्यांच्यामुळेच अंधारात वाट चुकलेलं जीवन नव्या प्रकाशानं उजळून निघतं. शिक्षक जीवनाला योग्य दिशा दाखवतात. म्हणूनच या विशेष दिवशी आपल्या आवडत्या शिक्षकांना खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचे आभार मानणं ही एक सुंदर परंपरा बनली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात किमान एक तरी आवडता शिक्षक असतो, ज्याची शिकवण आयुष्यभर लक्षात राहते. म्हणूनच या खास दिवशी आपल्या आवडत्या शिक्षकांना मनापासून शुभेच्छा, संदेश आणि आभार व्यक्त करणं ही खरी गुरुदक्षिणा मानली जाते. तर, आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही त्यांना व्हॉट्सअप, ग्रीटिंग्ज, मेसेजद्वारे पाठवू शकता किंवा स्टेटसवर ठेवू शकता. जाणून घेऊ या काही हटके शुभेच्छा संदेश.

शिक्षकांना ‘या’ शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस बनवा खास!

गुरूशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही.

तुमचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी राहो हीच अपेक्षा.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या शिकवणीमुळे आमच्या आयुष्याला नवा मार्ग मिळाला.

तुमचं मार्गदर्शन नेहमी असंच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही,

तर आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे.

अशा सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन!

अपूर्णाला पूर्ण करणारा,

शब्दांनी ज्ञान वाढविणारा,

जगण्यातून जीवन घडविणारा,

तत्त्वांतून मूल्ये फुलविणाऱ्या

ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक पावलावर दिशा दाखवणारा,
प्रत्येक क्षणी आत्मविश्वास वाढवणारा,
आपलं आयुष्य सोन्यासारखं घडवणारा म्हणजे शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे या शिक्षकदिनानिमित्त आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांना वरील शुभेच्छा मेसेजद्वारे पाठवू शकता.