‘हर हर शंभू’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. या गाण्यावर अनेक रील्सही बनवल्या जात आहेत. मात्र हे गाणं गाणाऱ्या गायिकेवर टीका केली जात आहे. मुस्लिम धर्मीय असून शिव भजन गायल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आलंय. ‘हर हर शंभू’ फेम फरमानी नाझने युट्युबवर आजवर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहे. पण या भक्तिगीतामुळे तिला इतकी प्रसिद्धी मिळेल याचा तिने कधीही विचार केला नसेल. इन्स्टाग्राम आणि युट्युबवर तिची गाणी चर्चेत आहेत.

या गाण्यांच्या माध्यमातून फरमानी नाझने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दिवसरात्र मेहनत करून तिने यशाचे शिखर गाठले आहे. याचेच फळ म्हणजे तिच्याकडे १ कोटी रुपयांचा स्वतःचा स्टुडिओ आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ फरमानीने आपल्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण तिचा सुंदर स्टुडिओ पाहू शकतो. पण स्टुडिओपेक्षाही स्टुडिओमध्ये असणाऱ्या देव्हाऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Viral Video : ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेनही पडली नदीत; धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

स्टुडिओच्या पहिल्या खोलीत भिंतीवर वेगवेगळी युट्युब बटन्स लावलेली आहेत. यानंतर, फरमानी मुख्य स्टुडिओमध्ये प्रवेश करते. तिने मुख्य स्टुडिओमध्ये मंदिरही बांधले आहे. याशिवाय, तिने तिचा भाऊ फरमानसोबत गाण्याची जागाही दाखवली आहे. ही जागा मंदिराच्या अगदी समोर आहे.

Optical Illusion: तुम्ही या चित्रात सर्वप्रथम काय पाहिले? उत्तरावरून जाणून घेता येणार तुमचं व्यक्तिमत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर शंभू’ या गाण्यावरून झालेल्या वादावर फरमानी सांगते, ‘हे गाणे मी श्रावणात गायले होते. काय जे आता चांगलं चाललंय. आपण कोणत्या धर्माचे आहोत याचा विचार करून मी कधीच गात नाही, कारण कलाकारांना धर्म नसतो.’ ती पुढे म्हणाली, ‘आम्ही आमच्या स्टुडिओत काम करतो तेव्हा आम्ही कोण आहोत हे विसरून जातो. आम्ही फक्त कलाकार आहोत, हे समजून आम्ही काम करतो, कारण हे आमचे काम आहे.’ फरमानी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रतनपुरी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मोहम्मदपूर माफी गावातील रहिवासी आहे.