Harsha Bhogle Payslip Viral Post : हर्षा भोगले भारताच्या सर्वात लोकप्रिय क्रिकेट समालोचकांपैकी एक आहेत. भोगले यांनी ४० वर्षांपूर्वी त्यांना पहिल्या समालोचनासाठी मिळालेल्या मानधनाची पे स्लिप नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पे स्लिप शेअर करत भोगले यांनी म्हटलंय की, ४० वर्षांपूर्वीचा माझा पहिला वनडे. संधी मिळवण्यासाठी धडपड करणारा तो युवक आजही मला आठवतोय. डीडी-हाईडच्या एका निर्मात्यांनी त्याला ब्रेक दिला. एका संध्याकाळी मी साधारण टी-शर्ट घालून रोलवर बसलो होतो. पडदा खेचण्याचा काम मला देण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी दोनदा कॉमेंट्री करण्याचं कामही देण्यात आलं. पुढील १४ वर्षात मला आणखी दोन वनडे आणि एक टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली.

दूरदर्शनच्या मास्टहेडमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भोगले यांना सहा तासांच्या कॉमेंट्री सत्रासाठी ३५० रुपयांचं मानधन दिलं जायचं. हे पत्र ५ सप्टेंबर १९८३ ला लिहिण्यात आलं होतं. या पोस्टवर एका ट्वीटर यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जबरदस्त समालोचक. तुमच्यामुळे क्रिकेटच्या गोष्टी ऐकण्याचा उत्साह वाढला.

नक्की वाचा – Video : सर्वात मोठ्या किंग कोब्राशी नडला! पण सापाने पाण्यातच तरुणाला घाम फोडला, फणा काढला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, हे खूप हृदयस्पर्षी आहे. शेअर करण्यासाठी आणि आम्हाला आठवण करून दिल्याबद्दल आभार. कुणीही शून्यापासूनच सुरुवात करतो. तसंच डीडी नॅशनलने @DDNational यांनी भोगले यांच्या पोस्टला रीपोस्ट करून लिहिलं की, दूरदर्शनचा स्विकार करण्यासाठी हर्षा भोगले यांना धन्यवाद. आम्हाला पूर्वीपासूनच माहित होतं की, तुम्ही एक चांगला विकल्प आहात.