पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नाही. पुण्यात एकापेक्षा एक अफलातून गोष्टी नेहमी पाहायला मिळतात. अगदी व्यक्तींपासून ते वस्तूंपर्यंत एकापेक्षा एक गोष्टींची पुण्यात रोज चर्चा होत असते. कधी पुणेकर, कधी पुणेकरांची किस्से, कधी पुण्यातील रिक्षावाले तर कधी पुण्यातील रिक्षा….कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. पुणेरी पाट्यांइतकेच पुण्यातील रिक्षावाले प्रसिद्ध आहे. पुण्यातील रिक्षाचालक सहसा त्यांच्या पुणेरी शैलीमुळे चर्चेत असतात पण सध्या एका अतंरगी रिक्षाची चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर पुण्यातील एका रिक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, रिक्षाचा मागील भाग दिसतो बुद्धीबळाचा पटाचे चित्र दिसते जो निळ्या आणि पांढऱ्या रंगानी रंगलेला आहे. ज्यावर चेकमेट लिहिलेले दिसत आहे. तसेच पांढऱ्या खाण्यामध्ये, राजा, वजीर, हत्ती, घोडा असे बुद्धीबळाच्या प्याद्यांचे चित्र दिसत आहे.
जस जसा व्हिडिओ पुढे तसा रिक्षाचा एक बाजू दिसते ज्यावर लिहिले आहे की महाराष्ट्र सुंदरी नंबर १. तसेच डरकाळी देणार्या वाघाचे चित्र दिसत आहे. रिक्षाच्या छतावर मागील बाजूस इंडीकेटर दिवा लावलेला आहे. तसेच पुढील बाजूस मोठा दिवा लावलेला दिसत आहे. रिक्षामध्ये आलिशान सीट लावलेले दिसत आहे. ही हचके रिक्षा रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर unique.punekarवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कोणी कोणी बघितली झापूक झापूक झुपूक रिक्षा.” व्हिडीओला क्रेटेक्सचे झापूक झुपूक हे गाणे जोडले आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहे. अनेकां हार्टवाले इमोजी टाकले आहेत. कोणी कोणी बघितली झापूक झापूक झुपूक रिक्षा या प्रश्नाचे उत्तर देताना एकाने गमंतीत म्हटले, “आताच पाहिली व्हिडीओमध्ये”