Shark Egg: शार्क हा सर्वात खतरनाक माशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण शार्ककडे इतकी प्रचंड शक्ति असते की एका क्षणात तो बोट सुद्धा उलटी करू शकतो. महासागरात शार्कने हल्ला केल्याच्या कित्येक बातम्या आजवर समोर आल्या आहेत. शार्कशी पंगा घेणं म्हणजे जणू मृत्यूलाच आव्हान देण्यासारखंच आहे. मात्र याच शार्क माशाची अंडी कशी असतात हे तुम्ही पाहिलंय का? नाही ना. मग हा व्हिडीओ पाहा, शार्क माशाच्या अंड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शार्कही अंडी घालत असून शार्कच्या दुर्मिळ अंड्याचा व्हिडीओ समोर आला आहे.एका तरुणीनं शार्कच्या अंड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. बीचवर फिरत असताना तिला हे अंड आढळलं. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा या अंड्याच्या आत एक लहान शार्क दिसला. शार्क समुद्रातच अंडी घालते. समुद्राच्या तळाशी असलेल्या या अंड्यांमधून मुले बाहेर पडतात, जी थोड्या वेळाने आईसोबत शिकार करायला लागतात. पण कधी कधी ही अंडी लाटांच्या बरोबरीने किनाऱ्यावर येतात. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, शार्क मासा इतका महाकाय आहे, मग त्याचे अंड कसे असते, तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये वाद! तरुणीने थेट महिलेच्या अंगावर सोडला कुत्रा, VIDEO पाहून येईल संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शार्क खूपच वजनदार मासा आहे. मात्र इतकं वजन असून सुद्धा तो हवेमध्ये प्रचंड वेगानं उडी मारू शकतो. शार्क हा समुद्रातील सर्वात मोठ्या माशांपैकी एक आहे. एका शार्कचा सरासरी आकार हा २० ते ४० फूट लांब असतो. तर या माशाचं वजन २८ टन म्हणजे जवळपास ४ हत्तींच्या बरोबर असतं. यावरूनच शार्क किती महाकाय मासा आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र लक्षवेधी बाब म्हणजे इतकं वजन असताना सुद्धा तो ६० मैल प्रतितास इतक्या वेगानं पोहू शकतो. अन् शिकार करताना तर तो यापेक्षाही जास्त वेगानं पोहोतो