पोपट हा असा पक्षी आहे जो माणसांसारखा बोलू शकतो. मिठू मिठू बोलणारा पोपट आता माणसांसारखा वागायलाही लागला आहे. कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पोपट चक्क माणसांसारखेच सायकल चालवताना दिसत आहे. तुम्हाला विश्वाश बसणार नाही पण असे खरंच घडलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले आहेत.
इंस्टाग्रामवर creativenest.ideas नावाच्या पेजवर हा सायकल स्वार पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोपट हटके अंदाजमध्ये सायकल चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही सायकल पोपटासाठी तयार करण्यात आली आहे. सायकलला चाक चाक आहेत आहे ज्यांना पॅडलच्या स्वरुपात जोडले आहे. पॅडला छोटे छोटे हँडल जोडले आहेत त्यावर दोन पाय ठेवून उभा राहतो आणि सायकल चालवतो. जस जसे पोपट सायकलचे पॅडल फिरवतो तशी सायकल रस्त्यावर धावू लागते. ही आगळी वेगळी सायकल आणि पोपटाचा सायकल चालवण्याचा हटके अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहे.
हेही वाचा – “खबडक खबडक घोडोबा…”; खेळण्यातील चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो? पाहा फॅक्टरीतील Viral Video
हेही वाचा – गॅसवर नव्हे कुकरच्या वाफेवर बनवली गरमा गरम कॉफी; विक्रेत्याचा हटके जुगाड, पाहा Viral Video
लोकांना व्हिडीओ प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही लोक या हटके सायकलचे आणि पोपटाचे कौतूक करत आहे. काही लोकांनी पंख असूनही सायकल चालवणाऱ्या पोपटाची खिल्ली उडवली आहे. व्हायरल व्हिडीओवर एकाने कमेंट केलीस,”एखादा पक्षी हे करू शकतो ही खरंच अविश्वसनीय आहे पण पंख असताना हे करण्याची गरज काय?” तर दुसरा म्हणाला, “ज्याने कोणी हे तयार केले तो अत्यंत हुशार आहे”