Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात, जे अनेकदा मजेशीर किंवा हास्यास्पद असतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाहीत. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. एरवी तुम्ही अनेकांना हेडफोन्स घालून गाणी ऐकाताना पाहिलं असेल पण कधी कोणत्या प्राण्याला हेडफोन घालून गाणी ऐकताना पाहिलंय का? नाही ना…मग हा व्हिडीओ पाहा, ज्यात एक बकरी हेडफोन्स घालून गाणं ऐकताना दिसून आली. एवढचं नाहीतर त्यानंतर हेडफोन्स घालताच बकरीनं असं काही केलं की व्हिडीओ पाहून तुहीही अवाक् व्हाल.
माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात. त्यांनादेखील चांगल्या-वाईट गोष्टीची समज असते. मुके प्राणीही माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करु शकत नसले तरी त्यांच्यातही भावना असतात. हे या व्हिडीओतून समोर आलंय.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक बकरी दिसत असून बकरीच्या कानात यावेळी हेडफोन्स घातल्याचे दिसून येते. हेडफोन्सवर यावेळी गाणं सुरु असतं आणि गाणं वाजताच गाण्याच्या तालावर बकरी अशी थिरकू लागते की पाहून सर्वांचेच डोळे विस्फारतात. याआधी कधीही कोणी बकरीला नाचताना पाहिले नाही ज्यामुळे तिला असे गाण्यावर थिरकताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गाण्याचा आनंद घेत बारीक अगदी आनंदात गाण्याची मजा लुटत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही एवढं नक्की.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडिओ viral_india.official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये बकरीलाही गाण्यांची आवड असं लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनाही हसू आवरत नाहीये. सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विनोदी पद्धतीने टिप्पणी केली की, Genz बकरी आहे. तर आणखी एकानं, वाह वाह काय काय बघावं लागतंय अशी प्रतिक्रिया दिली आहे.