अमेरिकेतल्या रस्त्यावर एक विचित्र घटना पाहायला मिळली. पीठाने भरलेला एक ट्रक बेकरीच्या दिशेने जात होता. या ट्रकमध्ये यीस्ट घालून आंबवलेलं पीठ होतं. अनेक बेकरीमध्ये पाव, पॅटिस असे पदार्थ बनवण्यासाठी आंबवलेल्या पीठाला मोठी मागणी असते. तेव्हा या ट्रकमधून पीठ वाहून नेलं जातं होतं. पण यावेळी थोडा विचित्र प्रकार घडला. दुपारची वेळ होती, त्यामुळे पीठातल्या यीस्टची प्रक्रिया जलद गतीने व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे पीठ अधिकच फुलत गेलं. शेवटी हे पीठ एवढं फुललं की ट्रकमधून ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलं. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. एका महिला वाहतूक पोलिसाने याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा : अलोम बोगरा आणि शाहरुखच्या सेल्फीमागचा खोटारडेपणा उघड
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या रस्त्यावर अशाच एक विचित्र घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. जवळपास साडेतीन हजार किलो ईल माशांना घेऊन एक ट्रक निघाला होता. पण ट्रक चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघातादरम्यान ट्रकमध्ये असणारे ईल मासे रस्त्यावर पडले. हे मासे दिसायला सापासारखे दिसतात. जेव्हा हे मासे विचित्र परिस्थितीत सापडतात तेव्हा ते चिकट पदार्थ स्त्रवतात.अपघात झाल्यानंतर असंच काहीसं झालं. हे सारे मासे रस्त्यावर पडले आणि पांढरा चिकट पदार्थ माशांबरोबर रस्त्यावर पसरला होता तेव्हा तासन् तास रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.