सोशल मीडियावर मदतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. एकमेकांना मदत करणं हा माणसाचा सर्वात मोठा धर्म आहे. मदतीचे व्हिडिओ पाहून माणुसकी जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत केल्याने अनेक व्हिडिओ समोर येत असतात. असे व्हिडिओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक हेलिकॉप्टर पायलट अनोख्या अंदाजात जमिनीवर झाडू मारताना दिसत आहेत. एक वृद्ध व्यक्तीची मदत केल्याने नेटकऱ्यांनी पायलटचं कौतुक केलं आहे.

व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती झाडू घेऊन रस्त्यावर पडलेला कचरा साफ करत आहे. रस्त्यावर बराच अंतरापर्यंत कचरा पसरलेला दिसत आहे. जो त्या वृद्धाला साफ करण्यासाठी बराच वेळ लागला असता. मात्र ही बाब हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पायलटच्या लक्षात आली. त्याने आकाशातून हेलिकॉप्टर जवळ आणत काही सेकंदात सगळा कचरा गोळा करून दिला. हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्याने तो कचरा काही क्षणात साफ झाला. या उपकाराच्या बदल्यात त्या वृद्ध व्यक्तीने पायलटचे हात जोडून आभार मानले. पायलटच्या या समजुतीने वृद्धांचे काम तर झालेच पण वैमानिकालाही आंतरिक आनंदाची अनुभूती आली असेल.

हा व्हिडिओ घंटा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य येईल.’ या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.