Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. याच सगळ्या घडामोडीच्या दरम्यान या परस्थितीवरून सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच क्रियेटीव्ह झालेत. एकनाथ शिंदे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, अशा अनेक राजकीय व्यक्तींवर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2022 रोजी प्रकाशित
Eknath Shinde: ‘शोधू कुठे, शोधू कुठे…” एकनाथ शिंदेंच्या प्रकरणावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
वेगेवगळ्या वेब सिरीज, टीव्ही मलिका, सिनेमे यांचा आधार घेत हे मीम्स बनवले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 22-06-2022 at 13:32 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeट्रेंडिंग न्यूजTrending NewsशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious memes on maharashtra political crisis and eknath shinde went incommunicado ttg