अभिनेत्री अनुष्का शर्माने गरोदर असल्याचं जाहीर करताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. विराट कोहली व अनुष्का शर्माने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ‘गुड न्यूज’ असल्याची माहिती दिली. ‘जानेवारी २०२१ पासून दोनाचे तीन होणार’, असं लिहित विराट व अनुष्काने फोटो पोस्ट केला. त्यावरून आपल्या विनोदबुद्धीचा वापर करत नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुष्काच्या प्रेग्नन्सीवरून बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळत होत्या. विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अनुष्काने वारंवार त्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र लॉकडाउनदरम्यान या सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडीने घरात चिमुकला पाहुणा येणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious memes viral on anushka sharma pregnancy virat kohli post ssv
First published on: 27-08-2020 at 12:19 IST