जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हापासून ते सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. भारताच्या पाककलेच्या विविधतेबद्दल त्यांनी मनापासून अनेकदा कौतुकही केलं आहे. तर आज त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते लखनऊच्या बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसले आहेत. तसेच त्यांनी बिर्याणी खाऊन झाल्यानंतर एक कौतुकाची पोस्टदेखील लिहिली आहे.
राजदूत हिरोशी सुझुकी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. व्हिडीओत एका भारतीय हॉटेलमध्ये राजदूत बसले आहेत. हॉटेलचा कर्मचारी (वेटर) एका खास बाऊलमधून राजदूत हिरोशी सुझुकी यांच्या ताटात बिर्याणी वाढतो आहे. तसेच राजदूतसुद्धा त्याच्याकडे अगदीच उत्सुकतेने बघताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत राजदूत काळ्या रंगाचा कोट घालून बाऊलमध्ये बिर्याणी खाताना दिसत आहेत. राजदूत यांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…“बादशाह तर तो आहे!” शाहरुख खानच्या वाढदिवसाने व्यापारी महिलेचे आयुष्य बदलले… पाहा हृदयस्पर्शी पोस्ट
पोस्ट नक्की बघा :
लखनऊमध्ये घेतला बिर्याणीचा आस्वाद :
राजदूत हिरोशी सुझुकी लखनऊला गेले होते. तेव्हा त्यांनी तिथे सलग दोन दिवस बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “सलग दोन दिवस लखनवी बिर्याणी खाल्ली. आजवरची सगळ्यात चांगली (बेस्ट) बिर्याणी”; अशी त्यांनी कॅप्शन दिली आहे. राजदूत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या लखनऊ भेटीदरम्यानचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत; ज्यात त्यांनी लखनऊमधील बारा इमामबाराच्या वास्तुकलेलासुद्धा भेट दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट राजदूत हिरोशी सुझुकी यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @HirosuzukiAmbJP या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. त्यांना बिर्याणी खाण्याचा मोह आवरला नाही, हे सांगत त्यांनी एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे आणि लागोपाठ दोन दिवस लखनऊमध्ये बिर्याणी खाण्यास गेलो हेसुद्धा आवर्जून त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. ही पोस्ट पाहून अनेक युजर त्यांना हैदराबाद आणि बंगाल येथील बिर्याणी आवर्जून खाण्यास कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत आणि ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेताना दिसते आहे.