Elephant Attack: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हत्तींबद्दल अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की हा अतिशय समजदार प्राणी आहे. मात्र हत्ती तितकाच रागीटही आहे. रागात हत्ती आपल्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट तोडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हत्ती हा एक शांत प्राणी आहे, परंतु कधीकधी तो वाईट मूडमध्ये देखील येतो आणि जेव्हा हत्ती वाईट मूडमध्ये असतो तेव्हा त्याच्या जवळ जाण्याचा विचारही करू नये. हत्ती रागावला आणि तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तो काहीही करू शकतो. तुम्हाला ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा…

young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Wedding Video
नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल
a beautiful mother dance in son's wedding
हौशी आईने केला मुलाच्या लग्नात ‘महबूबा महबूबा’ गाण्यावर मनसोक्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी सासू….”
Bangladeshi Subway Surfer
धावत्या रेल्वेच्या छतावर चढून तरुणाने केला सबवे सर्फर-प्रेरित धोकादायक स्टंट! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले,” मुर्खपणा..

(हे ही वाचा : Viral Video: आजीला कॅन्सरशी झुंज देताना पाहून चिमुकला रडू लागला, शेवटी जे घडलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील )

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलात एक हत्ती आरामात आपले अन्न खाताना दिसतो आहे. हत्तीला पाहून एक मुलगी त्याच्या जवळ जाऊन उभी राहते. हत्तीला ती मुलगी आपल्या जवळ येणे पसंत नव्हते, असे दिसते. त्या तरुणीला पाहून हत्तीला राग येतो आणि हत्ती त्या मुलीला सोंडेने ढकलतो. लगेचच ती मुलगी खाली जोरात पडते. यानंतर तिला कमरेच्या खाली लागतं आणि ती हात मागे ठेवून पळते.

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @PicturesFoIder नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा २६ सेंकदाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ २३.८ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, “हत्तीने अशी प्रतिक्रिया का दिली?” आणखी एका युजरने लिहिले, “हत्तीने असा धडा शिकविला की, पुढच्या वेळी ती असं काही करणार नाही.” अशा प्रकारच्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.