Anand Mahindra Shared Hotel Room Shocking Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी डोंगर कड्यावर बांधलेल्या एका हॉटेल रुमचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. दरीजवळ बांधण्यात आलेल्या या रुमचं डिजाईनचं सौंदर्य त्यांना आवडलं आहे. परंतु, जगभरात मुसळधार पावसामुळे घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांचा विचार केला तर, हे खूप भीतीदायक आहे. पावसामुळे जर दु्र्दैवाने या ठिकाणी घातपात झाला, तर जीव गमवावा लागू शकतो, असं महिंद्रा यांना वाटतंय. त्यांनी पाऊस, पूर आणि दरडी कोसळण्याची भीती या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “या सुंदर डिजाईनला पाहून मी आश्चर्यचकीत झालो असतो. पण जगभरात मुसळधार पावसामुळे निसर्ग संकट ओढावतं. मी या ठिकाणी एका रात्रीसाठी जाईल, असं मला वाटत नाही.” व्हिडीओत काच आणि लाकडाने बनवलेला एक बेडरुम दिसत आहे. हा बेडरुम एका दरीजवळ लटकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून ६ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

नक्की वाचा – पाणी भरण्यासाठी महिलेनं केला भन्नाट जुगाड, व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणाले, ‘टॅलेंटला तोड नाय’

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत पाहून यूजर्स म्हणाले….

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका ट्वीटर यूजरने म्हटलं, ज्या प्रकारे हा रुम बांधण्यात आला आहे, ते पाहून इथं कधीच थांबणार नाही. एका अन्य ट्वीटर यूजरने म्हटलं, शरीराचं वजन, लोकांची संख्या, बाहेरील नैसर्गिक परिस्थिती या गोष्टींमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर आणखी एक यूजर म्हणाला, हे खूप सुंदर आहे पण या ठिकाणाला पाहून मला खूप काळजी वाटते. ‘सर, मी लाकूड आणि काचेच्या मजबूतीबाबत अधिक चिंताग्रस्त आहे,’ असंही एका यूजरने म्हटलं.