Shocking video: माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर आयुष्याच्या सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात. अशाच एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशाच एका रस्त्यानं बाईकवरुन चाललेल्या व्यक्तीच्या डोक्यावर घराचं छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार कुठेतरी जात असताना अचानक घराचे छत कोसळले. दुचाकीस्वार त्यात अडकतो आणि त्या ढिगाऱ्याखाली गाडला जातो. त्याचवेळी मागे बसलेल्या महिलेने चपळाई दाखवत दुचाकीवरून उडी मारली. अचानक झालेला हा अपघात पाहून आजूबाजूचे लोक तात्काळ त्याच्या मदतीला धावून आले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @UnseeMedia नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. अवघ्या ३९ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. व्हिडिओ पाहून लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओवर युजर्सनी अशा प्रतिक्रिया दिली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अचानक हा प्रकार घडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “खूप धोकादायक व्हिडिओ.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्या व्यक्तीचे काय झाले असेल ते माहित नाही.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “कदाचित त्याला जास्त दुखापत झाली नसेल.” इतर अनेक युजर्सने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.