नुकताच नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नऊ दिवस दुर्गामातेच्या विविध रुपांची पुजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनांसाठी भक्तांची रांग लागते. अनेकसाठी निर्जल आणि अनवाणी उपवास करतात. नऊ दिवस भक्त देवीची मनोभावे पुजा करतात. तर काही ठिकाणी गरबा-दांडीया या खेळाचे आयोजन केले जाते. सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. आज काल अनेक जण दुर्गामातेच्या विविध रुपामध्ये फोटो शुट करताना दिसतात. अनेक अभिनेत्री आणि इन्फ्ल्युएन्सर देवीच्या रुपातील आपले फोटोशुट करतात आणि दुर्गामातेच्या विविध रुपातील माहिती प्रेक्षकांना देतात. अशाचप्रकारे एक तरुणी पुण्यातील मंडई परिसरामध्ये दुर्गामातेच्या रुपात दिसली. देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकरांची काय होती प्रतिक्रिया?

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अनेकजण काही तरी हटके किंवा भन्नाट कल्पना शोधत असतात. आसपासच्या घडामोडींनुसार अनेक जण विविध प्रकारचा आशय तयार करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून प्रेक्षकांना तो आवडेल. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे त्यामुळे सर्वत्र देवीच्या विविध मंदिराचे, देवीच्या विविध रुपांची माहिती देणारे व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान काही तरुणी देवीच्या रुपामध्ये फोटो शुट करतात आणि देवीच्या विविध रुपाची माहिती देतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये पुण्याच्या मंडईमध्ये देवीच्या रुपातील तरुणीला पाहून लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे दर्शवण्यात आले आहे.

हेही वाचा – टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी रतन टाटांना वाहिली अनोखी श्रद्धांजली! श्वानाची ‘ती’ कृती पाहून उपस्थितही झाले भावूक; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

येथे पाहा Video

https://www.instagram.com/p/DA5QlAvsaJK/

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी लाल साडी परिधान करून, हातात त्रिशुळ घेऊ दुर्गा मातेच्या रुपात पुण्यातील मंडईत फोटो शुट करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान प देवीच्या रुपातील तरुणीला पाहून अनेक पुणेकर थक्क झाले आहे. काही क्षण साक्षात देवीचे दर्शन झाल्यासारखा आनंद आणि भाव अनेकाच्या चेहऱ्यावर दिसला. व्हिडीओमध्ये काही भाजी विक्रेते तरुणीचे कौतुक करत आहे. खूप छान दिसत आहे. खूप मस्त वाटत आहे अशा प्रतिक्रिया अनेकजण देत आहे. व्हिडीओमध्ये एक आजीबाई आपल्या विचारात मग्न असताना देवीच्या रुपातील ही तरुणी त्यांच्याशेजारी जाऊन बसते आणि काही वेळाने आजींचे लक्ष तिच्याकडे जाते तेव्हा त्या काही क्षण थक्क होतात. तर एक देवीच्या रुपातील तरुणीला पाहण्यासाठी पुन्हा मागे वळून पाहतात.

हेही वाचा –“आयुष्य खूप सुंदर आहे फक्त….” ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा नवा Video Viral, पुणेरी आजींची पुन्हा चर्चा!

येथे पाहा Video

https://www.instagram.com/reel/DAuyHUdsRkh/

हेही वाचा –

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर expressography नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “हेच ते निर्मळ प्रेम तुम्हा सर्वांचे आम्हा कलाकारांवर आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशी रूप वर्षभर लोकांना दिसू दे आणि स्री शक्तीचा आभास मनात जागू दे ! अप्रतिम” अशी प्रतिक्रिया एकाने व्हिडीओवर व्यक्त केले आहेय.