10th Result 2025 official Website Link : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. विद्यार्थी व पालकांची उत्सुकता पाहता सोशल मीडियावर तारखांबाबत खोटी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण, आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण विद्यार्थी १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..

महाराष्ट्र दहावीचा निकाल कुठे तपासायचा (Where to Check Maharashtra Class 10 SSC Results 2025)

दहावीचे विद्यार्थी २०२५ चा दहावीचा निकाल खालील वेबसाइटवर पाहू शकतात…

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

sscresult.mahahsscboard.in

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा ( check Maharashtra Class 10 SSC Results 2025)

१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.

२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक ) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.

५. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.

६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे. माध्यमिक शालांत परीक्षा एकून ६२ विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच यंदा फेरपरीक्षेचा अर्ज १५ मे २०२५ पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परिक्षा २४ जूनपासून सुरु होईलEditDelete