Viral video: पनीर हा पदार्थ देशभरात मोठ्या आवडीनं खाल्ला जातो. शाकाहारी लोकांनासाठी पनीर म्हणजे जणू देवानं दिलेली एक भेटच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शाकाहारी लोकांसाठी स्पेशल जेवण म्हटलं की डोळ्यांसमोर एकच पदार्थ येतो अन् म्हणजे पनीर. शाही पनीर, पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर पुलाव, पनीर बिर्याणी, पालक पनीर, पनीर रोल्स, मटर पनीर, पनीर पकोडा असे विविध पदार्थ पनीरपासून तयार केले जातात. पण हल्ली जवळपास सर्वच पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात भेसळ केली जाते. त्यामुळे मग पनीर सुद्धा या भेसळीपासून कसं दूर राहील? तुम्हीही जर डीमार्टमधून पनीर खरेदी करत असाल तर थांबा.. सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गृहिणीनं डी-मार्टमधून हे पनीर आणल्याचा दावा केला आहे. यावेळी ती पनीरचं पॅकेट उघडते तेव्हा तिला धक्का बसतो. कारण व्हिडीओमध्ये पाहू शकता, पनीर अतिशय चिकट झालं आहे आणि एक पांढरा रंगाचा चिकट पाण्यासारखा पदार्थ दिसत आहे. हे पनीर खराब आणि भेसळयुक्त असल्याचं सहज स्पष्ट होत आहे.
पण आता प्रश्न असा पडतो की हे खोटं पनीर ओळखायचं तरी कसं? तुम्ही खात असलेलं पनीर हे शुद्ध आहे की अशुद्ध हे कळणार कसं?
जे पनीर चावल्यानंतर रबरासारखं चिकट किंवा ताणल्या जात आहे, असं वाटतं ते भेसळीचं समजावं.
पनीरचा एक तुकडा हातावर घ्या आणि दोन्ही हातांनी त्यावर हलकाचा दाब देऊन चोळा. पनीर तुटलं नाही तर ते शुद्ध आहे असं समजावं. जर पनीर लगेचच मोकळं होऊन तुटत असेल तर त्यात भेसळ आहे.
शुद्ध पनीरचा रंग अगदी पांढरा शुभ्र आणि सुवास दुधासारखा असतो. भेसळीच्या पनीरचा रंग पिवळसर दिसून येतो. शिवाय त्याला सुवासही नसतो.
सोयाबीन पावडर वापरूनही पनीरची शुद्धता ओळखता येते. यासाठी पनीर पाण्यात उकळून घ्या. पाण्यातून बाहेर काढा. हलकासा दाब देऊन त्यातले पाणी काढून घ्या. त्यावर सोयाबीन पावडर शिंपडा. १० मिनिटांनी तपासून पहा. पनीरचा रंग बदलून हलकासा लाल झाला असेल, तर ते भेसळीचं आहे. शुद्ध पनीरचा रंग बदलत नाही.
पाहा व्हिडीओ
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.