एखाद्या गृहिणीसाठी किंवा कोणतीही व्यक्ती जी स्वयंपाक करते, त्यासाठी पोळ्या करणे फारच कष्टाचे किंवा वेळखाऊ काम वाटू शकते. कारण- चपात्या किंवा पोळ्या करण्यासाठी आधी त्यांना लाटायचे, मग तव्यावर भाजून शेवटी गॅसवर छान टम्म फुगवून घ्यायचे. अशी सगळी क्रिया करण्यासाठी नाही म्हटले तरी वेळ लागतोच. मात्र, सोशल मीडियावर अगदी काही मिनिटांमध्ये भराभर पोळ्या तयार करण्याचा एक अतिशय भन्नाट असा जुगाड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर rajput_jodi_ नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता यात अशी कोणती शक्कल लढवून पोळ्या बनवल्या गेल्या आहेत ते पाहू. व्हिडीओच्या सुरुवातीला एक बाई मळून ठेवलेल्या कणकेचा एक भला मोठा गोळा उचलते आणि स्वच्छ ओट्यावर पुन्हा थोडासा मळून घेते. मात्र, असे करताना ती त्या कणकेच्या गोळ्याला हळूहळू खेचून लांब करून घेते. आता त्या लांब केलेल्या कणकेच्या गोळ्यावर थोडेसे पीठ पसरवून, कणकेचा तो गोळा भराभर लाटून घेते.

हेही वाचा : Video : साखरेवर ठेवायचे आहे नियंत्रण? मग, ‘लाल’ रंगाच्या कपाचा करा वापर! पाहा अजब व्हायरल टीप

आता ती बाई त्या लाटलेल्या कणकेमध्ये माध्यम आकाराच्या पातेल्याच्या मदतीने अगदी मस्त गोल पोळ्या तयार करून घेते. ही युक्ती वापरून व्हिडीओमधील बाई एकाच वेळेस चार पोळ्या लाटून घेते. आता या लाटून तयार झालेल्या पोळ्यांना भराभर तव्यावर एकत्र शेकून घेते; आणि नंतर एकेक करून सर्व पोळ्या गॅसच्या आचेवर भाजून घेते. असे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो.

याआधीसुद्धा पोळ्या लाटायचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका महिलेने पोळी लाटण्यासाठी कणकेचे लहान लहान पाच गोळे एकमेकांवर ठेवून, त्यांना एकत्र लाटून एकाच वेळी पाच पोळ्या तयार करून दाखवल्या होत्या. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या या युक्तीवर नेटकऱ्यांची काय मते आहेत ते पाहू.

“ओ ताई, पोळ्या कच्च्या राहिल्या आहेत”, असे एकाने लिहिले आहे. “मी तर एवढ्या वेळेत १०-१२ पोळ्या लाटून घेईन, असे दुसऱ्याने तर, “माझ्या घरी, माझी बायको हेच करते” असे तिसऱ्याने सांगितले. “काम विनाकारण मेहनत घेऊन करण्यापेक्षा, ते हुशारीने करा” असे चौथ्याने लिहिले आहे. “ही युक्ती भारताबाहेर नाही गेली पाहिजे,” असे पाचव्याने लिहिले आहे.

हेही वाचा : Viral video : एका मिनिटात पाच पोळ्या होतील लाटून; पाहा व्हायरल होणारी ‘ही’ Kitchen hack…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकंदरीत @rajput_jodi_ ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मात्र मिश्र स्वरूपाच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २९.९ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.