IRS Officer Shared UPSC Mains Marksheet : केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. जर जगातील सर्वात कठीण परीक्षांची लिस्ट केली, तर यूपीएससी परीक्षा त्या लिस्टमध्ये अव्वल स्थानी असेल. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करावा लागतो. काही विद्यार्थी अनेक वर्ष या परीक्षेची तयारी करत असतात. खूप अभ्यास करतात तरीही ते या परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत. प्रचंड मेहनत आणि नशीब जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा या परीक्षेत यश मिळवणं शक्य होतं.

पण तु्म्ही कधी या परीक्षेत पास झालेली मार्कशीट पाहिली आहे का? परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळत असतील. नुकतच एका इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकाऱ्याने (IRS Officer) त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर यूपीएससी मुख्य परीक्षेची मार्कशीट शेअर केली आहे. या मार्कशीटला पाहून तुम्हाला माहित होईल की, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता असते.

नक्की वाचा – Video: आनंद महिंद्रांनी हॉटेल रुमचा थरकाप उडवणारा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “एक रात्रही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआरएस अधिकारी अंजनी कुमार पांडे यांनी ट्वीटवर शेअक केलेल्या मार्कशीटसोबतच एक महत्वाचं कॅप्शन दिलं आहे. जुन्या फायली काढत असताना आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट सापडली. मुख्य परीक्षा (UPSC Mains) यूपीएससीत यशस्वी होण्याचं साधन आहे, उमेदरवारांनी लक्षात ठेवा. आयआरएस अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या या मार्कशीटला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या पोस्टला यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, तुमचा अभिमान वाटतो. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, सिविल सर्व्हिसची मार्कशीट आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळाली.