आज काल चोरीच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गाड्या चोरी करताना, कधी दागिणे, तर कधी पर्स…चोरटे सर्वकाही चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कोणताही व्यक्ती मेहनत करून हव्या असलेल्या सोयी-सुविधा मिळवतो. पण जेव्हा कोणी मेहनतीने कमावलेली गोष्ट चोरुन नेतो तेव्हा कोणत्याही व्यक्तीला खूप वाईट वाटतेय मग ती वस्तू छोटी असो किंवा मोठी. चोरीपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड करताना दिसतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने सायकल चोरी होऊ नये म्हणून भन्नाट जुगाड वापरले आहे.

सायकल चोरी होऊ नये म्हणून हटके जुगाड

जुगाड करून आपली गरज पुर्ण करणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण लोक असे जुगाड घेऊन येत असतात जे पाहून सर्वांना धक्का बसेल. आता व्हायरल होत असलेला व्हिडीओच पाहा… या व्हिडीओमध्ये एका कचरापेटीजवळ एक सायकल उभी केलेली दिसते. सायकला कोणतीही साखळी किंवा लॉक लावलेले नाही. काही लोक सायकलजवळ येतात आणि चालवण्याचा प्रयत्न करतात. व्हिडीओमध्ये पाहूशकता की, एक एक करून कित्येक लोक सायकल चालवण्याचा प्रयत्न करताता आणि सायकल तिथेच सोडून पळून जातात.

हेही वाचा – तुमच्या जीन्सचा काळा रंग फिका पडलाय का? मग ‘ही’ सोपी ट्रिक वापरा अन् घरच्या घरी द्या रंग

हेही वाचा – शिन-चॅनने गायले लोकप्रिय ‘खलासी’ गाणे; आंकाक्षा शर्माचा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “हा तर गुजराती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरी करणाऱ्यांना घडवली अद्दल
चोरी करणाऱ्यांना माहित नसते की हा एक प्रँक आहे. कित्येक लोक सायकल नीट तपासून न घेता, सायकल चालवायला लागतात. व्हिडीओमध्ये पाहू शकता की सुरुवातीला एक महिला सायकल जवळ येते आणि सायकल चालवर बसण्याचा प्रयत्न करते. जशी ती सायकलवर बसण्याचा प्रयत्न करते तसे सीट खाली जाते आणि लोंखडी रॉड तिला जोरात लागतो. महिला सायकल सोडून पळून जाते. त्यानंतर दोन पुरुष देखील सायकल चोरी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासह देखील असेच घडते. हे सर्व दृश्य लांब उभे असलेल्या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे.