हत्ती आणि माणसात होणारे संषर्घ काही नवे नाहीत. आपण त्यांच्या जंगलांची नासधूस केली. तेव्हा आता अन्नाच्या शोधात छोटेमोठे रानटी प्राणीच नाही तर हत्ती देखील शेतात घुसू लागले. शेतात घुसून पिक खाणं, इतर झाडांची नासाडी करणं असे वाईट अनुभव अनेकदा शेतकऱ्यांना आले असतील. एका ट्रक चालकालाही असाच अनुभव आला. बटाटे वाहून नेणारा ट्रक एका रानटी हत्तीने भर रस्त्यात थांबवला. एवढंच नाही तर या ट्रकमध्ये असलेले बटाटेही हत्तीने खाण्याचा प्रयत्न केला. आपलं नुकसान होऊ नये म्हणून ट्रक चालकाने फटाके फोडून हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण हत्ती काही घाबरला नाही.

वनधिकाऱ्यांनी देखील हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण हत्ती त्यांनाही ऐकेना. पश्चिम बंगालमधला हा व्हिडिओ आहे. इथे शेतकऱ्यांना अनेकदा हत्तीचा त्रास सहन करावा लागतो. शेतात घुसून हत्ती पिकांची नासधूस करतात पण रस्त्यावर असलेले खांब तुडवणं, गेट तोडून टाकणं असे प्रकार येथे अनेकदा घडले आहेत.