Viral Shocking News Today: लग्न करताना सर्व गोष्टी नीट पारखून घेतल्या जातात, किंबहुना तपासून घ्याव्याच अन्यथा गुजरातमधील या महिलेसारखाच डोक्याला ताप होऊ शकतो. अनेकदा महिला आपल्या नवऱ्याचा स्वभाव लग्नांनंतर बदलल्याच्या तक्रारी करतात. “तू आधी असा नव्हतास” या एका वाक्यामुळे कितीतरी नाती तुटली आहेत. पण स्वभाव बदलला तर तो पुन्हा मूळ रूपात बदलता येऊ शकतो पण एखाद्याने लिंगच बदललं तर.. गुजरातमध्ये समोर आलेलं एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. एका पत्नीने आपल्या पतीवर केलेला आरोप ऐकून नेटकऱ्यांचं डोकंसुद्धा चक्रावून गेलं आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊयात..
गुजरात राज्यातील वडोदरा शहरात एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे, आठ वर्षांपूर्वी या जोडप्याचे लग्न झाले. आठ वर्षाच्या संसारानंतर या महिलेला समजले की, तिचा पती पुरुष नाही. त्याने स्वत:वर लिंगबदल करुन शस्त्रक्रिया केली आहे. वडोदरा येथील गोत्री पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Video: भाजीविक्रेत्याचे अत्यंत किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद; भाजी मंडईत जाण्याआधी तुम्हीही व्हा सावध
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या तक्रारदार महिलेचे नाव शितल असून आपला पती विराज वर्धन (पूर्वीची विजया) याच्यावर ‘अनैसर्गिक संबंध’ आणि फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत केला आहे. यात तिने पतीकडील कुटुंबीयांचीही नावे दाखल केली आहेत.शीतल यांनी पोलिसांना सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी एका विवाह जुळणाऱ्या वेबसाइटवर त्यांची विराज वर्धन यांच्याशी भेट झाली.यापूर्वी शीतल यांच्या पहिल्या पतीचे अपघाती निधन झाले होते व त्यांच्या पदरात १४ वर्षांची एक चिमुकलीही होती. पुनर्विवाह करत असल्याने शीतल यांनी फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला.
२०१४ मध्ये विवाहबंधनात अडकल्यावर ते दोघे काश्मीरला हनिमूनसाठी गेले होते. यावेळी विराजवर्धन यांनी बरेच दिवस शीतल यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली होती. नंतर टाळणे अशक्य झाल्यावर त्यांनी सांगितले की रशियात असताना त्याला एक अपघात झाला होता. त्यामुळे तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे, मात्र एका शस्त्रक्रियेनंतर तो पूर्ण बरा होईल असे आरोपीने महिलेला आश्वासनही दिले होते.
Video: नवरीपेक्षा करवली भारी, नवरोबांचा तोल ढळला आणि भर मंडपातच.. वऱ्हाडी झाले थक्क
दरम्यान, जानेवारी २०२० मध्ये, त्याने तिला सांगितले की त्याला लठ्ठपणासाठी शस्त्रक्रिया करायची आहे. तथापि, त्याने नंतर खुलासा केला की तो दूर असताना त्याच्यावर लिंगबदलाची पुढील शस्त्रक्रिया झाली होती. या प्रकारानंतर त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवताना सिलिकॉनचे लिंग वापरले असाही दावा महिलेने तक्रारपत्रात केला आहे. या सर्व आरोपांना विराज यांनी फेटाळून लावले आहे.