Husband wife dance video: पत्नी- पत्नीचे नातं कायमच वेगळे असते. जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते जर हेच नाते अतिशय प्रेमळ असेल तर संपूर्ण घर आनंदाने राहते. अर्थात नवरा-बायकोच्या नात्यांचा परिणाम संपूर्ण त्यांच्या आयुष्यावर आणि घरावर होत असतो. मात्र सध्या नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला समजेल. अशाच एका जोडीचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी नाचताना दिसतायत. असे अनेक जोडप्यांचे व्हिडिओ आहेत, ज्यात पती -पत्नीमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. काही जोडपी खूप रोमँटिक असतात आणि त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळते. त्यांचा डान्सचा लयही दिसून येतो.

हा व्हायरल व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नसून, तो कोणीतरी पाहुण्यांच्या समोर शूट केला आहे. पारंपरिक वेशात सजलेला व्यक्ती आणि छान साडी नेसलेली बायको, दोघंही अगदी उत्साहात डान्स करत आहेत. गाण्याचे बोल आणि त्यावरचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे सगळंच पाहण्यासारखं आहे. दोघांची ट्युनिंग इतकी जबरदस्त आहे की, प्रेक्षक टाळ्यांनी दाद देताना थकत नाहीत.

पाहा व्हिडीओ

डान्स व्हिडिओ सध्या jagatik_marathi या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. पाच दिवसांपूर्वी अपलोड झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत तर नेटकऱ्यांनी लाखोंचे व्ह्यूजही व्हिडिओला मिळवून दिलेले आहेत. यावेळी कॅप्शनमध्ये, ती आली स्वप्नांच्या पालखीतून, मनात आनंदाचे गाणे घेऊन
रुप तिचे जणू चांदण्याचा प्रकाश
हसऱ्या डोळ्यांत प्रेमाचे मोती
सौंदर्य, साज, आणि संस्कार यांचा संगम
ही नवरी असली, तर नवरा खरा भाग्यवान! लिहले आहे.