Viral video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात.लग्न हे एक अनमोल बंधन आहे, जे दोन हृदय जोडण्यास मदत करते. विवाह हे पती-पत्नीमधील एक गहन नाते आहे, ज्यामध्ये दोघेही सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. पूर्वी घटस्पोट अगदी बोटावर मोजण्याइतके व्हायचे, पण आज ते प्रमाण वाढले आहे. परस्पर संमतीने घटस्पोट घेतले जातात. खरे तर मुला-मुलींच्या समजूतदारपणानेच बरेच प्रश्न सुटणार असतात, पण यासाठी एकमेकांचे सहकार्य अपेक्षित आहे. यामुळेच आजची तरुण पिढी लग्न करावं की करु नये, या प्रश्नावर घुटमळताना दिसतेय. मन चलबिचल होतंय. यावेळी अनेकांना असा प्रश्न पडतो की, जुन्या लोकांचे संसार एवढे वर्ष कसे टिकायचे? याचंच उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की नात्यामध्ये मोठ्या मोठ्या नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप मोठा आनंद असतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पत्नी जेवण बनवताना रागात दिसत आहे. ती चिडचिड करत पटकन चपाती लाटत नवऱ्याच्या ताटात वाढत आहे. पण नवरा आपली पत्नी असं का करत आहे याचं कारणही विचारत नाही. उलट तो एक भन्नाट ट्रीक वापरून एका सेंकदात तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्यांनी असं केलं तरी काय? ते म्हणजे नवरा हा रागावलेल्या पत्नीला कापडाचा पंखा हातात घेतो आणि पत्नी पोळी लाटत असताना तिला हळुवार हवा घालायला सुरुवात करतो. हे सर्व पाहून पत्नीच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा होतो आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू उमटतं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @you_need_it या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की या व्हिडीओला काही तासांतच हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. लोकही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलं, अरे चाहिये क्या? औरतको याचं उत्तर म्हणजे हा व्हिडीओ आहे…’या छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांसाठी खूप मोठ्या असतात…असंही एक जण म्हणाले आहेत.