Couple viral video: सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. जगात घडणारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते. सध्या असाच एक हौशी तरुण- तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तेलंगणातील हैदराबादमधून हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही चालू कारमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून आज कालच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडला आहे. पोलिसांचाही धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे.

हैदराबाद येथील पीव्ही नरसिंहराव एक्स्प्रेस वेवर चालत्या कारमध्ये एक जोडपे खुलेआम किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी आणि मुलगा कारच्या छतावर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक त्यांच्याकडे पाहत आहेत तरीही कशाचीही पर्वा न करता ते एकमेकांना खुलेआम किस करत आहेत.

तेथून जाणाऱ्या अनेकांनी ही घटना पाहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याच्या या कृतीचा सर्वजण निषेध करत आहेत. अनेक युजर्सनी हैद्राबाद पोलिसांना टॅग करत या प्रकरणावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी तर रस्ता सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आनंद महिंद्रांनाही सह्याद्रीच्या सौंदर्याची भुरळ; VIDEO शेअर करत म्हणाले…”आपल्यालाही संकटांना”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाठीमागून येणाऱ्या एका बाईकस्वाराने हा संपूर्ण प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांमुळेच अपघात होतात, अशा शब्दात काही नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांनी या जोडप्याला पाठिंबा देत हे त्यांचे वय एन्जॉय करण्याचे असल्याचे सांगितले. त्यांना ते करू द्या.