Auto driver secretly filming female students Viral Video : महिला आणि तरुणी आधीच सुरक्षित नाही. महिलांवर होणार्या अत्याचारांचे कित्येक प्रकरणे समोर रोज समोर येत असतात. अशातच रिक्षाने प्रवास करणेही धोकादायक झाले आहे. नुकताच एका रिक्षाचालकाच्या चुकीच्या वर्तनाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
दिल्ली विद्यापीठाजवळील लक्ष्मीबाई कॉलेजच्या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने गुप्तपणे महिला विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असे आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांना पाहून रिक्षाचालक अश्लील कमेंट करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. “I Love You Meri Jaan” अशा आक्षेपार्ह कप्शनसह त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
धाडसी तरुणीने रिक्षाचालकाला घडवली अद्दल
या गोष्टीची माहिती जेव्हा एका धाडसी तरुणाला मिळाली तेव्हा त्याने हा प्रकार उघड केला. युवकाने Instagram वरील कॅप्शन आणि चालकाचे रील्स आसपासच्या लोकांना दाखवले आणि त्याला जाब विचारला. चालकाने वारंवार आरोप नाकारले आणि म्हणाला की, “मी महिलांचे व्हिडिओ काढले नाहीत.”
तरुणाला पोलीसांना माहिती देणे योग्य वाटले पण रिक्षाचालकाने वारंवार चुकीची बाजू मांडली, त्यामुळे तो थोडा संतापला होता आ्रणि त्याने रिक्षाचालका चोप दिला. त्यानंतर त्याने ११२ ला कॉल करून सर्व माहिती पोलीसांना दिली जेणेकरून कारवाई करता येईल.” या प्रकारणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलीसांची कारवाई सुरू
पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर चर्चा रंगली असून अनेकांनी म्हटले आहे की, चालकांचे वर्तन निंदनीय आहे, पण कायदेशीर मार्गानेच यावर कारवाई होणे आवश्यक आहे.