अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडला. या सोहळ्यानंतर लाखोंच्या संख्येने भाविक श्रीरामाची एक झलक पाहण्यासाठी अयोध्येला भेट देताना दिसत आहेत. तसेच अनेक जण या ठिकाणी भक्तिभावानं येऊन अनेक भेटवस्तूही देताना दिसत आहेत. दरम्यान, आज माजी आयएएस अधिकारी यांनी श्रीरामाच्या चरणी एक अनोखी भेटवस्तू अर्पण केली आहे.

काल चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेशचे माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला सुमारे ४.५ ते ५ कोटी रुपये किमतीचं रामचरित्रमानस (रामायण) सुपूर्द केलं आहे. ही विशेष भेटवस्तू अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीजवळ ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा…मार्क झुकरबर्ग पुन्हा बॉक्सिंगचा सराव करण्यासाठी सज्ज; शस्त्रक्रियेनंतर पाच महिन्यांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाले, ‘तुमचं प्रेम…’

पोस्ट नक्की बघा…

माजी आयएएस (IAS) अधिकारी आणि त्यांच्या पत्नीनं अल्ट्राव्हायोलेट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोन्याच्या पानांवर रामायणातील हा मजकूर डिझाइन करण्यात आला आहे. २४ कॅरेट सोनं, चांदी व तांब्यापासून १४७ किलोचं हे रामचरितमानस (रामायण) तयार केलं गेलं आहे.

या रामायणाची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध बूममंडी बंगारू ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे. त्यांनी रामायण ठेवण्यासाठी एक खास स्टॅण्डदेखील तयार केलं आहे. त्यांना हे रामायण तयार करण्यासाठी जवळजवळ आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे. ही सर्व माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिली. तसेच माजी आयएएस (IAS) अधिकारी आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी ही खास भेटवस्तू श्रीरामाला अर्पण केली आहे; ज्याचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.