भूक आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, अगदी आपण पैसा कशासाठी कमावतो हा प्रश्न एखाद्याला विचारला तर ‘पोटासाठी’ हे उत्तर सहज दिल जात. आपल्याला भूक लागली की लगेच आपण काहीतरी बनवतो किंवा ऑर्डर करतो, त्यामुळे अन्न लगेच उपलब्ध होत, पण वन्य प्राण्यांना यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांना अन्न सहज उपलब्ध होत नाही. निसर्गातून जे काही उपलब्ध होईल त्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. तर कधीकधी खायला काहीही न मिळाल्यास अशा प्राण्यांचे हाल होतात. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून येत आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भूकेने व्याकुळ झालेला एक हत्ती दिसत आहे. तिथे पडलेले प्लास्टिक हत्ती खात असल्याचे दिसत आहे. कदाचित यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची कल्पना या हत्तीला नसेल. हा व्हिडीओ शेअर करत सुप्रिया साहू यांनी खंत व्यक्त केली आहे. पाहा त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

Viral Video : गाढ झोपेत असताना गेंड्याने उठवले अन्…; जीव मुठीत धरत कुत्र्याने काय केले एकदा पाहाच

सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

आणखी वाचा : कुत्र्याची पाणीपुरी पार्टी पाहिलीत का? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुप्रिया साहू यांनी खंत व्यक्त केली आहे. ‘जेव्हा मानव प्लास्टिक फेकून देण्याच्या सवयीचा गुलाम बनतो, तेव्हा त्याची किंमत वन्य प्राण्यांना मोजावी लागते. ही खूप मोठी शोकांतिका आहे’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या व्हिडीओ पाहून नेटकरीही निराश झाले असून, असे प्लास्टिक सगळीकडे उघड्यावर फेकण्याचा अनेकांनी विरोध दर्शवला आहे.