IAS Tina Dabi : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आणि सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी टीना डाबी यांना पुत्ररत्न झालं आहे. जयूपरच्या रुग्णालयात टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे. टीना डाबी आणि प्रदीप गवांडे हे दोघंही आई बाबा झाले आहेत. मुलगा झाल्याने हे दोघंही खूप खुश आहेत. टीना डाबी या २०१५ च्या IAS बॅचच्या टॉपर आहेत. ५ जुलैला त्या मातृत्त्वाच्या रजेवर गेल्या होत्या. आज जयपूरच्या रुग्णालयात त्यांनी मुलाला जन्म दिला.

टीना डाबी या गरोदर राहिल्या होत्या तेव्हा त्यांनी राजस्थान सरकारकडे जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंग द्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर त्या जुलै महिन्यात मातृत्वाच्या रजेवर गेल्या होत्या. टीना डाबी आणि IAS अधिकारी प्रदीप गवांडे यांचं २०२२ मध्ये लग्न झालं. त्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली होती.

पाकिस्तानच्या वृ्द्ध महिलांनी दिला आशीर्वाद

पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांना टीना डाबी यांनी जैसलमेरमध्ये पुन्हा घरं बांधून दिली होती. तसंच त्यांच्यासाठी बरंच काम केलं होतं. टीना डाबी आई झाल्या आहेत आणि त्यांना पुत्र रत्न झालं आहे हे समजल्यावर या महिलांनी त्यांना आशीर्वाद दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैसलमेरमध्ये महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांना शिक्षण मिळावं, त्यांनी त्यासाठी पुढे यावं म्हणून टीना डाबी यांनी बराच पुढाकार घेतला. तसंच महिलांविषयी ज्या काही कुप्रथा सुरु होत्या त्या बंद करण्यातही मोठा हातभार लावला. टीना डाबी या सोशल मीडियावरही खूपच प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे १६ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर सुमारे साडेचार लाख लोक त्यांना फॉलो करतात.