Viral video: आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. बरेच जणांना व्हॅनिला आईस्क्रिम आवडते, अशावेळी आपण आईस्क्रीमचा मोठा बॉक्सच घेतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपल्या मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हॅनिला आईस्क्रीम खाताना शंभर वेळा विचार कराल.

एका तरुणीने व्हॅनिला आईस्क्रीमचा डबा उघडताच तिला आतमध्ये जे दिसलं ते भयंकर आहे. हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीने व्हॅनिला आईस्क्रीमचा डबा उघडताच आतमध्ये आईस्क्रीम खराब झालेले दिसले. ज्याप्रमाणे दूध खराब झाल्यावर फाटल्यावर जसं दिसतं तसं हे आईस्क्रीम दिसत आहे. तरुणीने व्हिडीओमध्ये आईस्क्रीमच्या डब्यावरील एक्सपायरी डेटसुद्धा दाखवली आहे, ज्यावर ही तारीख २०२५ लिहिली आहे. मात्र, तरीही आईस्क्रीम खराब असल्यामुळे तरुणीने संताप व्यक्त केला आहे. तसंच हे जरी फ्रोझन कस्टर्ड असलं तरी तेसुद्धा खराबच असल्याचा तरुणीने आरोप केला आहे.

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कधी अश्लील भाषा तर कधी चुकीचा स्पर्श; छेड काढणाऱ्याला तरुणीने मास्टरमाईंडने पकडलं, VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ the_versatile_deepika या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावेळी तरुणीने कॅप्शनमध्ये, “तुम्ही आम्हाला दिलेलं हे फ्रोझन कस्टर्डदेखील नाही @kwalitywalls कृपया याचे काहीतरी करा. मला धक्का बसला आहे. फक्त पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, ना लोकांचे आरोग्य ना आपले जीवन. पुढे ती म्हणते, मला माहीत आहे की, आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टमध्ये फरक आहे, परंतु अशा प्रकारचे खराब डेझर्ट देऊ नका.”