तुमच्यापैकी अनेकांना सुट्टीच्या दिवसांत समुद्रकिनारी फिरायला आवडत असेल, काहींनातर समुद्राच्या लाटांमध्ये पोहायला, उड्या मारायला आवडते. त्यामुळे भारतात सुट्ट्यांच्या दिवशी अनेकजण समुद्र किनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. गोवा, मालवणसह मुंबईतही अनेक समुद्र किनारे आहेत जिथे सुट्ट्यांच्या दिवस लोक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करताना दिसतात. यात तुम्ही देखील समुद्र प्रेमी व्यक्ती असाल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा, कारण त्यामध्ये समुद्र किनारी पोहताना अचानक कोणते संकट येऊ शकते याबाबत सतर्क करण्यात आले आहे.

या व्हिडीओत माशांचा एक भलामोठा समूह समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या बरोबरीने उड्या मारताना दिसत आहे, समुद्र किनारी पोहताना असे दृश्य दिसल्यास लोकांनी सतर्क राहावे, अशी माहिती यातून देण्यात आली आहे.

समुद्रातील लाटांमध्ये मज्जा करत असताना बरेचदा असे घडते की, अचानक माशांचा एक मोठा समूह पोहणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करु लागतो. हे मासे खूप लहान असतात, मात्र किनाऱ्यावर आल्यानंतर ते उंच उड्या मारू लागतात. यावेळी अनेकांना वाटते माश्याने आपल्यावर हल्ला केला, पण प्रत्यक्षात हा हल्ला नसून एका मोठ्या संकटाची चाहूल असते, हे कायम लक्षात ठेवा.

तुमच्याबरोबरही असे घडल्यास तुम्ही तात्काळ पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला समुद्रात मज्जा करताना असे छोटे मासे किनाऱ्यावर उड्या मारताना दिसले तर सर्वप्रथम तुम्ही पाण्याबाहेर पडा. शक्य तितके लवकर पाण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा, कारण हे मासे हल्ला करण्याच्या उद्देशाने नाही तर आपला जीव वाचवण्याच्या उद्देशाने उड्या मारत असतात. कारण त्यांच्यामागे धोकादायक शार्क किंवा इतर मोठे मासे लागलेले असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रात पोहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर लहान मासे उड्या मारताना दिसत आहे. परंतु ते असे का करतायत यामागचे कारण समोर आले तेव्हा लोकांना धक्काच बसला. जेव्हा शार्क लहान माशांच्या समुहाला खायला येतात तेव्हा हे मासे अशा प्रकारे किनाऱ्यावर उड्या मारु लागतात. तुम्ही जर मासे किनाऱ्यावर अशाप्रकारे उड्या मारताना पाहिले असतील, तर याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला शार्क मासे आहेत आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर समुद्रातून बाहेर पडले पाहिजे, अन्यथा तुमच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.