सध्याच्या धावपळीच्या युगात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं आवश्यक आहे. यासाठी योग्य आहाराव्यतिरिक्त व्यायाम आणि योगावर भर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक वयाचे लोक व्यायामशाळेत घाम गाळताना दिसतात. करोनाचं संकट जसं कमी होतं तसं लोकं व्यायामशाळेकडे आपला मोर्चा वळवताना दिसतात. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्यायामशाळेतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती व्यायामशाळेत महिला ट्रेनरचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही कृती त्याच्या अंगलट येते.
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने व्यायाम करताना दिसत आहे. व्यक्ती श्वास न घेता पटापट पुलअप्स मारताना दिसत आहे. मात्र शेवटी असं होतं की पाच-सहा पुलअप्स मारल्यानंतर त्याचा हात सुटतो आणि थेट जमिनीवर पडतो. यानंतर महिला ट्रेनर धावत त्याच्याकडे जाते आणि त्याच्या ठिक असल्याची खात्री करून घेते. व्हिडिओ पाहिल्यानंतर असं समजते की, त्या व्यक्तीला या कृतीचा जबरदस्त फटका बसला आहे. मात्र तरीही ती व्यक्ती सर्व काही व्यवस्थित असल्याचं अभिनय करते.
व्यायामशाळेतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रांना टॅग करत आहेत. तसेच मजेशीर कमेंट्स करत आहेत.