चीनमधील १५ गगनचुंबी इमारती पाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच काळापासून या इमारतींचे बांधकाम चालू होते. काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांना जमीनदोस्त करण्यात आले. सरकारच्या या कृतीला विरोधही आहे. लोक याला पैशाचा अपव्यय म्हणत आहेत. युनान प्रांतातील या इमारती स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आल्या. अवघ्या काही सेकंदात आकाशाला स्पर्श करणाऱ्या इमारती जमिनीवर पडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणून स्फोटके वापरली

स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, या इमारती पाडण्यासाठी आणण्यासाठी ४.६ टन स्फोटके वापरली गेली आणि एकूण ४५ सेकंदात गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. ही कारवाई करताना, आजूबाजूच्या लोकांची खूप काळजी घेण्यात आली. इमारती पाडण्यापूर्वी जवळपासची दुकाने बंद करण्यात आली आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

OMG: ‘इथे’ सापडलं २७०० वर्षांहून अधिक जुनं लक्झरी शौचालय; जाणून घ्या त्याची खासियत

२००० मदत कामगार तैनात करण्यात आले

खबरदारी म्हणून, २००० मदत कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीला सामोरे जाता यावे. असे सांगण्यात येत आहे की या इमारती युनान प्रांताच्या कानमिंगमधील लियांग स्टार सिटी फेज II प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जात होत्या, परंतु मागणीअभावी हे काम जवळपास आठ वर्षे रखडले होते. या प्रकल्पाची किंमत सुमारे १ अब्ज चीनी युआन होती.

स्क्रॅपमधून विकत घेतलं जुनं ATM मशीन; उघडल्यानंतर चमकलं नशीब, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फक्त धुळीचे ढग दिसत होते

१५ गगनचुंबी इमारती कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचा मोठा ढिगारा पसरला. चीनची सरकारी वृत्तसंस्था सिन्हुआने नोंदवले आहे की इमारतींमध्ये ८५,००० ब्लास्टिंग पॉईंटवर ४.६ टन स्फोटके साठवली गेली आहेत. मिशन यशस्वी झाल्याची खात्री करण्यासाठी, दोन आणीबाणी सहाय्यक कर्मचारी आठ आपत्कालीन बचाव पथके स्थापन करण्यासाठी तैनात करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In just a few seconds 15 buildings in china were demolished at the same time watch the viral video ttg
First published on: 07-10-2021 at 14:59 IST