scorecardresearch

उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…

सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या मुलांचं वय १६ आणि १७ वर्ष इतकं

उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…
दोन महिन्यानंतर समोर आली माहिती (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

Two North Korea Teens 16 And 17 Executed For Watching K Drama” उत्तर कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. दक्षिण कोरियन तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली या दोन्ही विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. के-ड्रामा नावाने ओळखले जाणारे कोरियन चित्रपट पाहणे आणि त्यांचा प्रसार करणे हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा करण्यात आली.

मृत्यूदंड देण्यात आलेल्या एका मुलाचं वय १६ तर दुसऱ्याचं १७ वर्ष होतं. ‘द इंडिपेंडण्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांची ओळख उत्तर कोरियामधील रायनगांग प्रांतामधील शाळेत झाली होती. या दोघांनाही एकत्र अनेक दक्षिण कोरियन चित्रपट आणि अमेरिकी चित्रपट पाहिले होते. ‘मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही मुलांना सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. एका शहरामधील चौकात या मुलांना ऑक्टोबरमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असली तरी तिची माहिती आता समोर आली आहे.

सरकारने या मृत्यूदंडाच्या शिक्षेसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार या मुलांनी केलेला गुन्हा म्हणजे ‘पाप’ होतं. त्यामुळे घाबरलेल्या स्थानिकांना ही मृत्यूदंडाची शिक्षा प्रत्यक्षात उपस्थित राहून पाहणं बंधनकारक करण्यात आल्याचंही सरकारने स्पष्ट केलं. मागील वर्षी दक्षिण कोरियाने ११ दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. देशातील हुकूमशाह किम जाँग उनचे वडील किम जाँग दुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या कालावधीमध्ये लोकांच्या हसवण्यावर, खरेदीवर आणि मद्यप्राशनावर बंदी घालण्यात आलेली.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: किम जोंग उनचा वारसा ‘ती’ चालवणार? थेट अमेरिकेवर मारा करता येणाऱ्या अण्वस्त्र चाचणीला ९ वर्षांच्या चिमुकलीची हजेरी

देशामध्ये २०२० साली दक्षिण कोरियन चित्रपटांची मागणी वाढली होती. या चित्रपटांची लोकप्रियता वाढत असतानाच उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग उनने या चित्रपटांवर बंदीचे आदेश लागू करत उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश जारी केले. यामध्ये गंभीर गुन्ह्यांअंतर्गत थेट मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली. त्यानुसारच ऑक्टोबरमध्ये या दोन शाळकरी मुलांना सर्वांसमोर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 11:31 IST

संबंधित बातम्या