रस्त्यावरील कुत्र्यांना आपल्यातील बरेच जण घाबरतात. कारण रस्त्यावरून ये-जा करताना कधी कधी हे पटकन अंगावर येतात किंवा अचानक आपल्याला बघून भुंकायला सुरुवात करतात. पण, यातील अनेक जण हे प्राणीप्रेमी असतात आणि ते अशा घटनांना मुळीच घाबरत नाहीत. तर आज सोशल मीडियावर कोलकाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाळीव प्राण्याची मालकीण देवीच्या मंडपात तिच्या दोन कुत्र्यांना घेऊन जाते आणि मंडपातील गुरुजी अगदी मोठ्या मानाने त्यांचे स्वागत करताना दिसतात.

व्हायरल व्हिडीओ कोलकाताच्या दुर्गा देवी मंडळाचा आहे. एक तरुणी देवीच्या मंडपात तिच्या दोन पाळीव कुत्र्यांना घेऊन आली आहे. या दोन्ही पाळीव कुत्र्यांचे नाव कर्मा असे आहे. तसेच तिने या दोन्ही कुत्र्यांना पोशाखसुद्धा घातला आहे आणि अगदी सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना बेल्ट लावून मंडपात घेऊन आली आहे. तसेच या मंडपातील पुजारी यांनी पाळीव कुत्र्यांना टिक्का लावला आणि त्यांना प्रसाददेखील खाऊ घातला. तसेच हा सन्मान दिलेला पाहून एका पाळीव कुत्र्याने पुजाऱ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. देवीच्या मंडपात आलेल्या कुत्र्यांचे पुजाऱ्याने कशा पद्धतीत स्वागत केले एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…Video: जपानी तरुणीने स्वीकारले नवरात्री चॅलेंज! नऊ दिवस सादर केला दांडिया अन् गरबा

व्हिडीओ नक्की बघा :

मंडपात गुरुजींनी केलं मोठ्या मानाने स्वागत :

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गा पूजा हा सर्वांत मोठा धार्मिक सण मानला जातो. कोलकाता येथील दुर्गा पूजा आणि तेथील खास सजावट नवरात्रीच्या नऊ दिवशी अगदीच चर्चेचा विषय ठरली. तर यादरम्यान या पाळीव कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कारण अनेक दुर्गा पूजा मंडळात कुत्र्यांना प्रवेश करण्यास बंदी आहे, पण या मंडळाने पाळीव प्राण्यांना मंडपात येण्याची परवानगी देऊन त्यांचा खास पद्धतीत सन्मान केला, हे पाहून तरुणीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @oscarnakarma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हे अकाउंट या दोन्ही पाळीव कुत्र्यांचे आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करून तुम्हाला काय वाटते की कुत्र्यांना परवानगी द्यावी की नाही? असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. तसेच या प्रश्नावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. मंडपातील गुरुजी यांनी पाळीव प्राण्यांना दिलेलं प्रेम पाहून काही जण त्यांचे कौतुक करत आहेत. हेच जर रस्त्यावरचे कुत्रे तिथे आले असते तर त्यांना परवानगी दिली नसती, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.