Viral Video : चांगला जोडीदार हवा असे आपल्यातील अनेकांना वाटतं. पण, काही जण खूप प्रयत्न करूनसुद्धा मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी अपयशी ठरतात. अशा परिस्थितीत बरेच लोक विविध प्रयत्न करताना दिसून येतात. विविध डेटिंग अ‍ॅप, मैट्रिमोनियल साइट, नातेवाईक यांची मदत घेताना दिसतात. पण डेटिंग अ‍ॅप, मैट्रिमोनियल साइटवर जोडीदार शोधत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते; त्यामुळे अनेक जण या डेटिंग अ‍ॅपचा वापर करणे टाळतात. तर आज सोशल मीडियावर असचं काहीसं पहायला मिळालं आहे. एक तरुणी जोडीदार शोधण्यासाठी चक्क रस्त्यावर उतरली आहे आणि अनोख्या पद्धतीत तिचा नवरा शोधताना दिसली आहे.

सोशल मीडियावरील कॅरोलिना गिट्स नावाचीएक तरुणी जोडीदाराचा शोध घेत आहे. मॅनहॅटनमधील रहिवासी असलेल्या कॅरोलिनाला नवरा हवा आहे. पण ती त्याला कोणत्याही डेटिंग अ‍ॅप किंवा मैट्रिमोनियल साइटवर शोधत नाही. कॅरोलिनाने आता हे काम स्वतःच्या हातात घ्यायचे ठरवले आहे. यासाठी तिने एक बोर्ड बनवला आहे, ज्यामध्ये ‘नवरा शोधत आहे’ असे लिहिले आहे. या सुंदर इन्फ्लुएंसरचे बरेच चाहते आहेत; परंतु ती तिच्या स्वप्नांच्या राजकुमाराची वाट पाहत आहे.

हेही वाचा… महिलेने चुकून भलत्याच नंबरवर ट्रान्स्फर केले पैसे; मग पुढे असे काही झाले की, तुम्हालाही हसू रोखणे होईल अवघड; पाहा photo

व्हिडीओ नक्की बघा :

जोडीदार शोधण्यासाठी निवडला अजब मार्ग :

एका शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर एक तरुणी येते आणि रस्त्यात उभी राहते आणि मजकूर लिहिलेला एक बोर्ड घेऊन रस्त्याकडेला उभी राहते. या बोर्डवर ‘नवरा शोधत आहे’ असे लिहिलेलं आहे. तरुणी जोडीदार शोधण्यासाठी रस्त्यावर उभी आहे हे पाहून आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येकजण तरुणीकडे बघताना दिसत आहे. तरुणीची ही अनोखी कल्पना पाहून अनेक तरुण मुले आपल्या फोनमध्ये इन्फ्लुएंसरचे फोटो काढताना दिसून आले आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरात रस्त्यावर जमलेले बरेच लोक हे पाहून आश्चर्यचकित होत आहेत; तसेच काही जण हसताना दिसत आहेत आणि व्हिडीओच्या शेवटी एक तरुण येऊन इन्फ्लुएंसरला उचलून घेऊन जातो आहे आणि कदाचित तरुणीला तिचा जोडीदार भेटतो. व्हिडीओत तुम्हाला आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येकाचे हावभाव पोट धरून हसायला नक्कीच भाग पाडतील. जोडीदार शोधण्यासाठी तरुणीची हटके स्टाईल एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील हा मजेशीर व्हिडीओ @karolinaegeits या इन्फ्लुएंसरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहणारे अनेकजण तरुणीच्या कल्पनेवर विविध प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. तसेच काही जण व्हिडीओतील मजेशीर क्षण कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.